Full Width(True/False)

खास महिलांसाठी गार्मिनने भारतात लाँच केली नवी स्मार्टवॉच, पाहा किंमत-फीचर्स

मुंबईः जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी गार्मिन इंडियाने आज खास महिलांसाठी बनवण्यात आलेली जबरदस्त स्मार्टवॉच लाँच केली आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या हस्ते मुंबईतील एका कार्यक्रमात या स्मार्टवॉचला लाँच करण्यात आले. गार्मिन लि. च्या (नॅसडॅक-जीआरएमएन) युनिटने छोटे, स्मार्ट आणि आधुनिक स्मार्टवॉच – ‘लिली’ लाँच केले असून त्यात स्त्रियांनी स्त्रियांसाठी खास तयार केलेल्या असामान्य सुविधांचा समावेश आहे. या स्मार्टवॉचची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. वाचाः कंपनीच्या माहितीनुसार, या स्मार्टवॉच मध्ये महिलांच्या आरोग्य संबंधी अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. मेन्सट्रअल सायकल ट्रकिंग, नवीन लाँच प्रेग्नसी ट्रॅकिंग यासारखे फीचर या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहेत. अभिजात, दागिन्यासारखी डिझाइन असलेल्या लिलीमधे स्त्रियांच्या आरोग्यावर देखरेख ठेवणाऱ्या सुविधा देण्यात आल्या असून त्यात मासिक पाळीची माहिती आणि नव्याने लाँच करण्यात आलेली गर्भारपणावर देखरेख ठेवणारी सुविधा यांचा समावेश असून त्यामधे गरोदर स्त्रियांना त्यांचे आरोग्य, स्वास्थ्य आणि सक्रियपणाची माहिती तसेच गरोदरपणाचे फोटोजही शेयर करता येणार आहेत. गार्मिन लिली दोन प्रकारांत उपलब्ध करण्यात आले आहे. लिली स्पोर्टची किंमत २० हजार ९९९ रुपये तर लिली क्लासिकची किंमत २५ हजार ९९० रुपये आहे. वाचाः आजच्या स्त्रीसाठी यंदाचा आंतरराष्ट्रीय महिला दिन अजून खास बनवण्यासाठी आम्ही स्त्रियांनी स्त्रियांसाठी तयार केलेले लिली हे स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे घड्याळ स्त्रियांच्या गरजा व इच्छा लक्षात घेऊन सर्वोत्तम तंत्रज्ञान व आधुनिक सुविधांसह तयार करण्यात आले आहे. जास्तीत जास्त स्त्रियांना या नव्या स्मार्टवॉचचा फायदा व्हावा आणि त्यांना स्वतःचे तसेच कुटुंबियांचे आयुष्य अधिक निरोगी करण्यासाठी मदत होईल अशी आम्हाला आशा आहे, असे गार्मिन इंडियाचे संचालक अली रिझ्वी म्हणाले. स्त्रियांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करणाऱ्या सुविधांमधे मासिक पाळीचे ट्रॅकिंग आणि नव्याने लाँच करण्यात आलेले गरोदरपणाचे ट्रॅकिंग अशा सुविधांचा समावेश आहे. वाचाः गरोदर स्त्रियांना त्यांचे आरोग्य, स्वास्थ्य आणि सक्रियपणाची माहिती यांबरोबरच गर्भारपणाचे स्नॅपशॉटही मिळवता येतात. गार्मिन कनेक्ट अप आणि कम्पॅटिबल गार्मिन स्मार्टवॉचसह युजर्सना गरोदरपणातील लक्षणे, बाळाच्या हालचाली, रक्तशर्करा पातळी नोंदवता येते, स्वतःच्या आवश्यकतेनुसार रिमाइंडर्स लावता येतात आणि व्यायाम तसेच आहाराच्या टिप्सही मिळवता येतात. लिली हे सक्षम स्मार्टवॉच असून त्यात संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असणाऱ्या गार्मिनच्या अत्याधुनिक आरोग्य आणि फिटनेससंबंधित वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच संपूर्ण दिवसभर कनेक्शन, सोयीस्करपणा आणि पाच दिवसांची बॅटरी देते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sZCtRU