Full Width(True/False)

'गॉडझिला व्हर्सेस कॉन्ग' चा दबदबा; 'मुंबई सागा' ला मोठा फटका

मुंबई- लॉकडाउननंतर सुरु झालेल्या प्रेक्षकगृहांमुळे बॉलीवूडला चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात होती. अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होते. तर काही प्रदर्शित करण्यात आले होते. परंतु, पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात करोनाचा प्रसार वाढू लागल्याने त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसू लागला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागण्याची चिन्ह आहेत. २८ मार्च पासून राज्यात रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आल्याने त्याचा फटका सिनेमागृहांना बसला आहे. रात्रीच्या वेळेस होणारे शो बंद करावे लागल्याने प्रेक्षक संख्येत आणखीच घट येणार आहे. मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटात हॉलिवूड चित्रपट ने प्रेक्षकांवर पकड बनवून ठेवली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याने चित्रपटाने इतर चित्रपटांच्या मानाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने गुरुवारी ५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दररोज या चित्रपटाने ४ ते ५ कोटींची कमाई केली आहे. परंतु, याचा फटका इतर चित्रपटांना बसला आहे. '' या इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाने आतापर्यंत १३ कोटी ४३ लाखांची कमाई केली आहे. या चित्रपटाची घोडदौड आता मागे पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या कमाईवर प्रभाव पडला आहे. दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला '' काही खास जादू दाखवू शकला नाही. सिनेसमीक्षकांनी चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया दिली असली तरी प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. 'सायना' आतापर्यंत फक्त ३५ लाखांचीच कमाई करू शकला. 'रूही' चित्रपट एक आठवडा आधी प्रदर्शित झाल्याने त्याला चांगली कमाई करण्याची संधी मिळाल्याचं बोललं जातंय. 'रूही' ने आतापर्यंत २२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. परंतु, उत्तर भारतात वाढत्या करोना रुग्णांमुळे चित्रपट तेथे काही खास कमाई करू शकला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fmWqOM