मुंबई- रंगपंचमी आणि बॉलिवूड हे दरवर्षीचं समीकरण असतं. परंतु, करोना महामारीमुळे यावर्षी बॉलिवूडमध्ये कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. ज्या कलाकारांच्या घरी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यांनीही काळजी घेत सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या घरी राहून कुटुंबासोबत धुळवड साजरी करत आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह देखील दरवर्षी त्यांच्या घरी म्हणजे जलसावर एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यात अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रण पाठवलं जातं. परंतु, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम करणार नसल्याचं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. आज रंगपंचमीच्या मुहूर्तावर अमिताभ यांनी त्यांचा एक जुना फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अमिताभ यांनी त्यांचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो ते धुळवड खेळतानाचा आहे. या फोटोत अमिताभ, अभिषेक आणि दिसत आहेत. अमिताभ भरपूर रंग खेळून आल्यानंतर आपल्या मुलाला रंग खेळायला घेऊन जाताना दिसतायत. अमिताभ यांच्या कपड्यांना भरपूर रंग लागला आहे. तर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या जया छोट्याशा अभिषेकला त्यांच्या खांद्यावर बसवत आहेत. या फोटोमध्ये जया इतक्या वेगळ्या दिसत आहेत की त्यांना ओळखणं देखील कठीण आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी लिहिलं, 'रंग बरसे भीगी चुनर वाली रंग बरसे... होली है.' बॉलिवूडची रंगपंचमी आणि अमिताभ यांचंही एक नातं आहे. चाहत्यांची रंगपंचमी ही अमिताभ यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या 'सिलसिला' या चित्रपटातील रंग बरसे आणि 'बागबान' या चित्रपटातील 'होली खेले रघुबीरा' या गाण्यांशिवाय चाहत्यांची रंगपंचमी पूर्ण होऊच शकत नाही. धुळवड खेळताना अमिताभ यांच्या या गाण्यांना चाहत्यांची पहिली पसंती असते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PHtVjS