मुंबई- नवनवीन विषय आणि आशय असलेल्या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून नेहमीचं कौतुक होतं. आता मराठीतही निरनिराळे विषय हाताळले जात आहेत. त्या चित्रपटांतील भूमिका अधिक चांगली करण्यासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेताना दिसतात. प्रेक्षक त्यांचं कौतुक करतात. शिवाय, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून अनेक पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं. तिथे त्यांच्या अभिनयाचा गौरव केला जातो. पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर. प्लॅनेट मराठीतर्फे यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेला सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ' या चित्रपटाची निवड करण्यात आली. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला 'स्माईल प्लिज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर बेस्ट क्रिटिक या विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार 'हिरकणी' चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी आणि 'आनंदी गोपाळ' या चित्रपटासाठी भाग्यश्री मिलींद या दोघींमध्ये विभागून देण्यात आला. लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर याला बेस्ट क्रिटीकचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी अगदी उत्कृष्टरीत्या पार पाडलं. अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्याला मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, परिणीती चोप्रा, शरद केळकर यांसारखे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री मानसी नाईक हिनेदेखील तिच्या पतीसोबत पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bQ84y9