मुंबई: बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यांपैकीच एक म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ. टायगरचा आज ३१ वा वाढदिवस. त्याचा जन्म २ मार्च १९९० रोजी मुंबईमध्ये झाला होता. हा दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. पण स्टारकिड असूनही टायगरला कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही. एवढंच नाही तर त्याला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर काही काळातच त्यानं जबरदस्त फिटनेस आणि डान्स स्टाइलने प्रेक्षक आणि चाहत्यांची मनं जिंकली. टायगरच्या डान्स आणि अॅक्शन अवतारानं खरं तर सर्वांनाच भूरळ घातली. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, टायगर हा शिवभक्त आहे. टायगर त्याच्या दोन्ही कला या भगवान शंकरांना समर्पित करतो. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊयात टायगरविषयी काही खास गोष्टी... टायगर श्रॉफनं त्याच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याच्या आयुष्यातील प्रेरणा ही त्याला भगवान शंकरांकडूनच मिळते. टायगरनं सांगितलं होतं की, त्यानं आतापर्यंत जी गोष्ट करण्याचं ठरवलं होतं त्यातली एकही गोष्ट अपूर्ण सोडलेली नाही. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी कितीही कष्ट पडले तरीही टायगर ती मेहनतीने पूर्ण करतो. टायगरच्या आयुष्यात भगवान शंकरांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. जेव्हाही तो डान्सला सुरुवात करतो तेव्हा त्याची सुरुवात शिवस्मरणाने होते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी टायगर सोमवारी उपवास सुद्धा करत असे. पण नंतर कामाच्या बिझी शेड्युमध्ये त्याला हे करणं कठीण जाऊ लागलं. टायगर श्रॉफ सांगतो, 'भगवान शिवशंकर हे खूपच शांतताप्रिय आहेत पण जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हा त्यांचा राग किंवा त्रास तांडवाच्या रुपातून बाहेर पडतो.' टायगर त्याच्या बिझी शेड्युलमुळे सोमवरचा उपवास करू शकत नसला तरीही तो त्याच्या प्रत्येक नव्या कामाची सुरुवात सोमवरीच करतो. सोमवार हा शंकराचा दिवस असतो आणि तो दिवस शुभ असल्याचं टायगरचं मत आहे. त्यामुळे तो कोणत्याही कामाची सुरुवात सोमवरी करतो. टायगर श्रॉफबद्दलची सर्वात रंजक गोष्ट ही आहे की, टायगर हे त्याचं खरं नाव नाही. जॅकी श्रॉफ आणि आयशा यांचा मुलगा टायगरचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे. पण जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला लहानपणापासून प्रेमानं टायगर म्हणत असतं. जेव्हा टायगरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्यानं त्याचं खरं नाव बदलून टायगर श्रॉफ असं ठेवलं. टायगरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच 'हिरोपंती २' 'गणपत' अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटात टायगरचा डान्स आणि अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/306wHkI