Full Width(True/False)

Realme C21 स्मार्टफोन ५ मार्चला होणार लाँच, किंमत आणि फीचर्स लीक

नवी दिल्लीः Realme C सीरीजचा आगामी स्मार्टफोन ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने एका टीजर वरून याच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. रियलमी मलेशियाच्या फेसबुक पजेजवरून कंपनीने एक टीजर जारी केला आहे. ज्यात हँडसेटचे खास फीचर्स उघड झाली आहेत. या बजेट स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. हँडसेटमध्ये रियरवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. वाचाः रियलमीने स्पष्ट केले आहे की, रियलमी सी २१ मध्ये एक मोठी स्क्रीन दिली जाणार आहे. AliExpress वर लिस्टिंग वरून हे उघड झाले आहे. स्मार्टफोनला ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये आणले जाणार आहे. रियलमीच्या या फोनसंबंधी जाणून घ्या सर्वकाही. वाचाः Realme C21 स्मार्टफोनमध्ये ५ मार्च रोजी पडदा हटवला जाणार आहे. लाँच आधीच या स्मार्टफोनची खास फीचर्स ऑनलाइन लीक झाली आहेत. AliExpress वर रियलमी सी २१ आधीच लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग नुसार, सी २१ मध्ये ६.५२ इंचाचा एलसीडी (720 X 1600 पिक्सल) रेजॉलूशन स्क्रीन असणार आहे. हँडसेटमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच दिले जाणार आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिले जाणार आहे. रियलमी सी २१ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले जाणार आहे. वाचाः फोनमध्ये रियरवर एक ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. रियलमीच्या या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर देण्यात येणार आहे. फोनमध्ये रियरवर एक फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाणार आहे. डिव्हाइसमध्या मायक्रो यूएसबी पोर्ट, ३.५ एमएम ऑडियो जॅक आणि दोन सिम स्लॉट दिले जाऊ शकते. अली एक्सप्रेसवर फोनला जवळपास ११ हजार २०० रुपये ते ११ हजार ८०० रुपयांच्या किंमतीत लिस्ट केले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e03Yqb