Full Width(True/False)

पहिल्या सेलमध्ये या फोनचा जलवा, फक्त १० सेकंदात कंपनीला १०९ कोटीचा फायदा

नवी दिल्लीः ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, फोनच्या पहिल्या सेल मध्ये केवळ १० सेकंदात १५ मिलियन डॉलर (जवळपास १०९ कोटी रुपये) चा सेल्स रिवेन्यू मिळाला आहे. रियलमी जीटी ला कंपनीने आज पहिल्यांदा अनेक ऑनलाइन रिटेलर्स द्वारे उपलप्ध केले होते. हा फोन गेल्या आठवड्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. याच्या ८ जीबी रॅमच्या व्हेरियंटची किंमत २७९९ चिनी युआन म्हणजेच ३१ हजार ५०० रुपये आहे. तर १२ जीबी रॅमच्या व्हेरियंटची किंमत ३२९९ चिनी युआन म्हणजेच ३७ हजार १०० रुपये आहे. वाचाः रियलमी GT 5G चे फीचर फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.० आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. १२ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचे मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः या फोनमध्ये ६५ वॉट ची फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्रॉयड ११ ओएस वर बेस्ड Realme UI 2.0 वर काम करतो. कनेक्टिविटीसाठी यात वाय फाय ६, ब्लूटूथ ५.२, एनएफसी, ५जी शिवाय ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि एक यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. फोनला ग्लास आणि लेदर बॅक ऑप्शन दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O97hkl