Full Width(True/False)

मराठी कलाकार उतरणार क्रिकेटच्या मैदानात, सेलिब्रिटी लीगचं आयोजन

मुंबई- क्रिकेट हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय. अगदी कलाकारांच्याही. मग ते हिंदी चित्रपटसृष्टीतील असु देत किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील. वृद्धांपासून ते लहानांपर्यंत आवडीने पाहिला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आता क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता तुमचे लाडके कलाकारदेखील क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. यावर्षी पुण्यात '' म्हणजे याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मराठी कलाकार ट्रॉफी मिळवण्यासाठी एकमेकांविरुद्ध लढताना दिसणार आहेत. युवा उद्योजक आणि चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी काही दिवसांपूर्वी 'पीबीसीएल' म्हणजे पुनीत बालन क्रिकेट लीगची घोषणा केली होती. या लीगच्या सीजन १ चा लिलाव सोहळा पुण्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. याप्रसंगी माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. या स्पर्धेत सहा संघ असणार आहेत. पुनीत बालन, शोभा आर धारिवाल, जान्हवी आर धारिवाल, संगीतकार अजय-अतुल यांसह सर्व टीमचे कॅप्टन सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडेने केलं तर लिलाव प्रक्रियेचं सूत्रसंचालन राहुल क्षीरसागर यांनी केलं. कार्यक्रमाबद्दल बोलताना पुनीत म्हणाले की, 'आम्ही 'पीबीसीएल' मागील वर्षी आयोजित करण्याचा विचार करत होतो. परंतु, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ते होऊ शकलं नाही. आता पुन्हा एकदा सर्व सुरळीत होताना दिसतंय. मराठी चित्रपटसृष्टीदेखील यातून सावरत आहे. या लीगच्या निमित्ताने अनेक मोठमोठे कलाकार एकत्र येणार आहेत. या स्पर्धेत सहा संघ असून खेळाची पद्धत T-१० प्रमाणे असेल. प्रत्येकवर्षी असे नवीन प्रयोग करण्याचा आमचा पर्यटन असेल.' हे आहेत 'पीबीसीएल' चे कॅप्टन सहा टीमची नावं पुढीलप्रमाणे आहेत. महेश मांजरेकर- पन्हाळा पँथर्स, नागराज मंजुळे- तोरणा टायगर्स, प्रवीण तरडे- रायगड रॉयल्स, सिद्धार्थ जाधव- सिंहगड स्ट्रायकर्स, शरद केळकर- प्रतापगड वॉरियर्स, सुबोध भावे- शिवनेरी लायन्स. या कार्यक्रमात एकूण १०४ खेळाडूंचा लिलाव पार पडला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uGBTdk