Full Width(True/False)

'कसा असतो गायत्रीसोबतचा सीन' पाहा सुबोध भावेची गंमतीशीर पोस्ट

मुंबई: अभिनेत्री गायत्री दातारनं 'तुला पाहते रे' या मालिकेतून मराठी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पहिल्या वहिल्या मालिकेत गायत्री घरा-घरात लोकप्रिय झाली. या मालिकेनं तिला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. ईशा-विक्रांत यांची अनोखी लव्हस्टोरी असलेल्या या मालिकेत गायत्रीसोबत अभिनेता मुख्य भूमिकेत होता. त्यांची ही ऑनस्क्रीन जोडी कमालीची लोकप्रिय ठरली होती. आता सुबोधनं इन्स्टाग्रामवर गायत्रीसाठी नुकतीच एक पोस्ट केली आहे जी खूप व्हायरल होताना दिसत आहे. सुबोध भावेनं त्याच्या इनस्टाग्रामवर गायत्री दातारसाठी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यानं गायत्री दातारसोबत सीन कसा असतो हे सांगितलं आहे. जेव्हा एखाद्या सीनच्या वेळी सुबोध गायत्रीला म्हणतो, काय ग काय म्हणतेस? यावर गायत्री फक्त हसते अशा इमोजी त्यानं वापरल्या आहेत आणि त्यापुढे 'संपला सीन' असं त्यानं लिहिलं आहे. सुबोधच्या या पोस्टवर अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सुबोधच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेक कलाकारांनी हसरे इमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय काही युझर्सनी सुद्धा सुबोधच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एका युझरनं लिहिलं, 'या पोस्ट चा आवाज ऐकू आला कानात..' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'मी ही पोस्ट अक्षरशः ऐकू शकतो' तर आणखी एका युझरनं, 'फोटो आणि कॅपशन अप्रतिम' अशी कमेंट केली आहे. सुबोधच्या या पोस्टवर गंमतीशीर प्रतिक्रिया येण्याचं कारण म्हणजे, 'तुला पाहते रे' मालिकेच शूटिंग सुरू असताना सुबोधनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात काहीही न करत खूपच हसत असलेली सर्वांनी पाहिलं होतं. तिचा हा व्हिडीओ त्यावेळी खूप व्हायरलही झाला होता. तेव्हापासून गायत्रीचं हसणं नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलं आहे. आताही ही पोस्ट पाहिल्यावर चाहत्यांनी गायत्रीच्या जुन्या व्हिडीओची आठवण झाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/300XBuA