मुंबई: अमेरिकेतील सेलिब्रिटी ओपरा विन्फ्रे यांच्या चॅट शोमध्ये ब्रिटनमधील राजमहालाचा त्याग करू बाहेर पडलेले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजघराण्यासंदर्भात अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. मेगन यांच्या बाळासंदर्भात वंशद्वेषाचा आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे. यावर सिमी ग्रेवाल यांनी ट्विट करत मेगन मार्केल यांच्यावर निशाणा साधला आहे. मेगन यांनी राजघराण्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं ग्रेवाल यांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर सहानभूती मिळवण्यासाठी मेगन यांनी वंश आणि वर्ण भेदाचा मुद्दा काढलाय असंही सिमी ग्रेवाल म्हणाल्या. ट्विट करत असताना सिमी यांनी मेगन यांचा दृष्ट (Evil) असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर सिमी ग्रेवाल यांनी त्यांनी मेगन यांच्यासाठी वापरलेला (Evil) शब्द मागे घेत असल्याचं पुन्हा ट्विट केलं. दरम्यान, एप्रिल २०१९ मध्ये हॅरी आणि मेगनच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. ब्रिटनच्या राजघराण्यापासून दूर होण्याचा जेव्हा हॅरी आणि मेगन यांनी निर्णय घेतला होता तेव्हा ते सर्वात जास्त चर्चेत आले होते. माझा व मेगनचा विवाह झाला तेव्हा आम्ही अतिशय आनंदित व आशावादी होतो. अनेक वर्षे आम्ही अनेक आव्हानांशी सामना केला. राजघराण्यातून बाजूला होण्याचा हा निर्णय एकाएकी घेतलेला नाही. यावर अनेक महिने विचारमंथन झाले. हा निर्णय आम्हा दोघांसाठी अतिशय दु:खदायक आहे, मात्र त्याशिवाय गत्यंतरही नव्हते. अर्थात, आम्ही तुम्हा सर्वांपासून दूर जात आहोत, असे मानू नका,' असं हॅरी म्हणाले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3btIiAO