Full Width(True/False)

माझं वजन राष्ट्रीय मुद्दा बनला होता, विद्या बालनने सांगितला आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग

मुंबई- अभिनेत्री ही अनेक महिलांची आदर्श आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. तिने बॉलिवूडमध्ये असे चित्रपट केले जे फक्त महिला कलाकाराच्या आयुहस्यावर आधारित होते. म्हणजेच स्त्री भूमिकेला त्या चित्रपटांमध्ये जास्त महत्वाचं स्थान होतं. तिने प्रत्येक भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पडली. 'द डर्टी पिक्चर', 'कहानी', 'कहानी २', 'तुम्हारी सुलु', 'शकुंतला देवी' या आणि अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय करून तिने प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप पाडली. इतर अभिनेत्रींपेक्षा हटके काहीतरी करणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा तिचं वजन राष्ट्रीय मुद्दा बनला होता. एका मुलाखतीत तिने या गोष्टीचा खुलासा केला. ती म्हणाली, 'मी एका अशा कुटुंबातून आलेली आहे जिथे चित्रपटात काम कारण म्हणजे वेळ फुकट घालवणं असतं. मला तिथे कुणीही मार्गदर्शन करणारं नव्हतं. माझ्या आयुष्यात नेहमी हॉर्मोनल इशू होते. त्यामुळे माझं वजन सतत वाढत होतं. ते कधी कमी व्हायचं तर कधी वाढायचं. माझ्यावर जेव्हा बारीक दिसण्याचा दबाव होता तेव्हाच मी जाड दिसायची. त्यामुळे मला माझ्या शरीराचा खूप राग यायचा. मला वाटायचं माझं शरीर मला फसवतंय. मी खूप निराश व्हायचे.' त्यानंतर तिने या अडचणीचा कसा सामना केला ते सांगितलं. तिने म्हटलं, 'मी माझ्या शरीरावर प्रेम करायला सुरुवात केली. मला माझं शरीर आवडू लागलं. मग ते इतरांनाही आवडू लागलं. हळू हळू परिस्थिती बदलत गेली. लोकांनी माझं कौतुक करायला सुरुवात केली. मी तो बदल हेरला. मी मान्य केलं की, माझं शरीरमात्र एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे मी जिवंत आहे. ते नसेल तर मी काहीच नाही. त्यामुळे मी माझ्या वजनाचा विचार करणं बंद केलं.' विद्याने जे सांगितलं ते आजच्या मुलींसाठी खूप प्रेरणादायी आहे. तिने इतर मुलींनाही त्यांच्या शरीराची काळजी घेण्यास सांगितलं. वजन वाढलं म्हणून तुम्ही कुरूप होत नाही, असं तिने म्हंटलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3v4GK8i