Full Width(True/False)

टीव्हीसाठी लॉकडाउन हिट! प्राइम टाइमच्या गणितात झाला 'हा' मोठा बदल

मुंबई टाइम्स टीम गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात छोट्या पडद्याची घडी विस्कटली होती. मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळे प्रसारित करण्यासाठी मालिकांचे नवे भाग वाहिन्यांकडे नव्हते. परिणामी चित्रपट आणि जुन्या लोकप्रिय मालिकांचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यामुळे वाहिन्यांचं टीआरपीचं गणित काहीसं बिघडलं होतं. प्राइम टाइममधील टीव्हीची प्रेक्षकसंख्या कमी झाली होती. पण जेव्हा मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली तेव्हा प्रेक्षक पुन्हा टीव्हीकडे वळला. विशेष म्हणजे गेल्या वर्षी काही महिने लॉकडाउनमध्ये गेले असले तरीही टीव्हीच्या व्ह्यूअरशिपमध्ये वाढ झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. ही बाब टीव्हीविश्वाला सुखावणारी आहे. 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडिया' म्हणजेच 'बार्क'च्या आकडेवारीनुसार लॉकडउनपूर्व मनोरंजन वाहिन्यांची व्ह्यूअरशिप ५२ टक्के इतकी होती. ती लॉकडाउनच्या दिवसात ३९ टक्क्यापर्यंत घसरली होती. तर लॉकडाउनपश्चात म्हणजे २३ जूनपासून मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली; तेव्हा व्ह्यूअरशिपने ४५ टक्क्यांचा उच्चांक गाठला होता. याच दरम्यान अनेक मराठी-हिंदी वाहिन्यांनी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या होत्या. एकदंरच २०२० या संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास टीव्ही व्ह्यूअरशिपमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये ९ टक्के वाढ झाली. प्राइम टाइम काय सांगतो?लॉकडाउनपूर्वी प्राइम टाइमची व्ह्यूअरशिप १०५ दशलक्ष मिनिटं इतकी होती. ती लॉकडाउनच्या काळात ५० ते ७० दशलक्ष मिनिटांच्या घरात पोहोचली होती. पण लॉकडाउननंतर प्राइम टाइमच्या व्ह्यूअरशिपमध्ये वाढ झाली असून ती १०९ दशलक्ष मिनिटांपर्यंत आली होती. नॉन प्राइम टाइम हिट'प्राइम टाइम' अर्थात सर्वाधिक प्रेक्षकवर्ग मिळणारा कालावधी. छोट्या पडद्यावर 'प्राइम टाइम'चे तास म्हणजे संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्रौ १२ वाजेपर्यंत. याच वेळेत घरोघरी सर्वाधिक टीव्ही पाहिला जातो. पण लॉकडाउनच्या दिवसात हे प्राइम टाइमचं चित्र बदललं होतं. लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक (टीव्ही प्रेक्षक) घरी असल्यामुळे प्राइम टाइमच्या गणितात बदल झाल्याचं दिसलं. तर 'नॉन प्राइम टाइम'मध्ये टीव्ही पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे. मनोरंजन वाहिन्यांच्या व्ह्यूअरशिपमध्ये २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली. तर लहान मुलांसाठी असलेल्या मनोरंजन वाहिन्यांच्या व्ह्यूअरशिपमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ झाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MEw9zs