Full Width(True/False)

आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसीने सांगितलं काय मिळालं छाप्यात

मुंबई- आयकर विभागाने अभिनेत्री हिच्या घरावर टाकला. यासोबतच यासंदर्भात तिची सतत चौकशी केली जात आहे. तापसीवर आरोप आहे की ६५० कोटींच्या कर अनियमिततेत आणि तापसी पन्नू यांचा सहभाग आहे. या प्रकरणात आयकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथे शोधमोहीम राबविली. शुक्रवारी रात्री पुण्यात तापासी आणि अनुराग यांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. आता या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच अभिनेत्रीने मौन सोडत ट्विटरवर आपला मुद्दा मांडला आहे. तापसीने सलग तीन ट्वीट केले. यात तिने लिहिले की, 'मुख्यत: तीन गोष्टींची तीन दिवस सखोल तपास करण्यात आला. १. पॅरिसमध्ये असलेल्या तथाकथित बंगल्याची किल्ली. कारण मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जाते.' आपल्या दुसर्‍या ट्वीटमध्ये, तापसीने छापेमारीतील दुसऱ्या मुद्द्यावर भाष्य केलं. तिने लिहिले की 'कथित पाच कोटींची कथित पावती जी भविष्यासाठी आहे.' तापसी पन्नूला पाच कोटी रुपयांची रोख रक्कम देण्यात आली होती आणि तिच्या घरातून पावती मिळाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. आपल्या तिसर्‍या ट्वीटमध्ये तापसीने लिहिले की, सन्माननीय अर्थमंत्र्यांनुसार, २०१३ मध्ये माझ्या इथे छापा पडला होता. यापुढे मी स्वस्तातली कॉपी राहिली नाही.' कंगनाचं नाव न घेता तिने कंगनाला टोला लगावला. कंगनाने तिला अनेकदा स्वस्तातली कॉपी म्हणून संबोधले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PF7jkj