Full Width(True/False)

Realme 8 Pro मध्ये ६५ वॅट फास्ट चार्जिंग, लवकरच होणार लाँच, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः रियलमी भारतात आपली नवीन सीरीज ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. या सीरीज अंतर्गत स्मार्टफोन्स कधीपर्यंत लाँच केले जाणार यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दरम्यान अपकमिंग सीरीजच्या प्रीमियम डिव्हाइस ला सर्टिफिकेशन वेबसाइट FCC वर स्पॉट करण्यात आले आहे. या लिस्टिंग नुसार, या फोनमध्ये ६५ वॉट ची फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे. वाचाः लीक झालेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फोनमध्ये कंपनी 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि पंचहोल डिझाइन डिस्प्ले सोबत येण्याची शक्यता आहे. वाचाः फोनमध्ये कमीत कमी ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी यात स्नॅनड्रॅगन ७३० जी चिपसेट ऑफर करू शकते. फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड Realme UI 2.0 सोबत येणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरा मिळू शकतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स, एक दोन मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या किंमती संदर्भात अद्याप काहीही सध्या सांगितले जावू शकत नाही. रियलमी ८ प्रोचे फीचर आणि वैशिष्ट्ये पाहता या फोनची किंमत २० हजार रुपयांच्या रेंज मध्ये असू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MQ2d3t