मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौतचा तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपट 'थलायवी' प्रदर्शनासाठी तयार आहे. हा चित्रपट येत्या २३ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी कंगनाच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. जे. जयललिता यांची अभिनय कारकिर्द ते राजकारण हा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. कंगनाच्या 'थलायवी' चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. एक दिवस आधी कंगनानं एक मोशन पोस्टर शेअर करत २३ मार्चला ट्रेलर रिलीज होणार असल्याचं सांगितलं होतं. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरचीच चर्चा सुरू आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला बॅकग्राउंडमध्ये एक आवाज ऐकू येतो,'आता एक अभिनेत्री आम्हाला शिकवणार का की राजकारण कसं करायचं.' यानंतर कंगनाचा आवाज ऐकू येतो. त्यानंतर जे. जयललिता यांच्या अभिनय कारकिर्दितली वेगवेगळी दृश्य दाखवली जातात. त्यानंतर पुन्हा एक आवाज येतो, 'हे पुरुषांचं जग आहे आणि आपण एक स्त्रीला पुढे करून उभे आहोत.' आणि या वाक्यनंतर कंगना जे. जयललिताच्या राजकारणातील लुकमध्ये दिसते. या नंतर ट्रेलरमध्ये जयललिता म्हणजेच कंगना रणौतची दमदार एंट्री होते. ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री होण्याचा प्रवास सुद्धा दाखवण्यात आला आहे. ज्यात कंगनाचे वेगवेगळे सुंदर लुक पाहायला मिळणार आहेत. एवढंच नाही तर जयललिता आणि एमजेआर यांचं नातं सुद्धा या ट्रेलरमध्ये सुंदर पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे या शिवाय जयललिता यांनी कशाप्रकारे राजकारणात एट्री केली होती. हे या ट्रेलरमध्ये स्पष्ट दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही एक झलक दाखवण्यात आली आहे. तसेच जयललिता यांच्यासोबत झालेल्या दुर्वव्यवहाराच्या घटनेचं चित्रणही या चित्रपटात करण्यात आलं आहे. या ट्रेलरमधील एक डायलॉग मात्र सर्वावर आपली छाप सोडतो, '...क्योंकि महाभारत का दूसरा नाम है जया' एकंदर कंगनाचा दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जे. जयललिता यांचा प्रवास एवढा सुंदर पद्धतीनं दाखवण्यात आला आहे की, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f6TyoY