मुंबई: अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंकिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती तिचे डान्स व्हिडीओ , बॉयफ्रेंडसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. त्यामुळं दिवंगत अभिनेता याचे चाहते तिला प्रचंड ट्रोल करतात. सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु सुशांतच्या चाहते त्याच्या आत्महत्येसाठी अंकितालाही तितकंच जबाबदार ठरवत आहेत. तिच्या फोटोंवर विचित्र प्रतिक्रिया, शिवीगाळ करत ते त्यांचा राग व्यक्त करतात. यालाच अंकितानं सडेतोड उत्तर दिलं आहे. अंकितानं नुकतंच इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला, त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. सुशांतसोबतच्या नात्याबद्दलही ती बोलली. सुशांत त्याच्या मार्गानं गेला, त्यासाठी मला का दोषी ठरवलं जात आहे, मी काय केलंय?, असा सवाल तिनं सुशांतच्या चाहत्यांना केला आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या डान्स आणि फोटोवर अतिशय खालच्या पातळीवरच्या प्रतिक्रिया येत आहेत. मला इतकंच सांगायतं आहे की,तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा फोटो आवडत नसतील तर मला फॉलो नका करू. मला ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्याच्या वाटेला मी जातचं नाही. तुम्हाला माझ्या नात्यांबद्दल काही माहिती नसेल तर माझ्यावर कमेंट करणं चुकीचं आहे. या चा मला त्रास होतो की नाही यापेत्रा याचा माझ्या आई वडिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. अंकिता आणि सुशांत जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर ते वेगळे झाले. सुशांतच्या आत्महत्येनंतर या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली होती. एवढंच नाही तर अंकितानं यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांना आपला पूर्ण पाठींबा दिला होता. वेळोवेळी ती सुशांतच्या बहिणींसोबत खंबीरपणे उभी राहिलेली पाहायला मिळाली होती. मी देखील डिप्रेशनमध्ये गेले होते. माझं आणि सुशांतच्या नात्यात कोण बरोबर , कोण चुकीचं याबद्दल आता मला काहीही बोलायचं नाहीए. प्रत्येक गोष्टीसाठी मला दोष देणं बंद करा, आणि मी आवडत नसेल तर सरळ मला अनफॉलो करा', असंही अंकितानं म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3068POr