मुंबई- मोठ्या पडद्यावर आपल्या अदाकारीने सगळ्यांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री यांनी जवळपास दोन दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांची गणना अशा अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्यांनी त्या काळातील सर्व दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. फक्त १३ वर्षाच्या वयात त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून हिंदी चित्रपटांकडे येणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'संगम' चित्रपटात वैजयंती यांनी राधाची भूमिका साकारली होती. जी त्या काळी खूप बोल्ड मानली जात होती. त्यांच्यावर चित्रित झालेलं 'मुझे बुढ्ढा मिल गया' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. 'संगम' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वैजयंती आणि यांच्यात अफेअर सुरु झालं होतं. त्यांचं आणि राज यांचं नातं इतकं घट्ट झालं होतं की त्यांनी लग्न करण्याचा विचार सुरु केला होता. परंतु, राज आधीपासून विवाहित होते. शिवाय त्यांना मुलंही होती. वैजयंती आणि राज यांचे संबंध समजल्यानंतर राज यांच्या पत्नी कृष्णा त्यांना सोडून आपल्या मुलांसहीत एका हॉटेल मध्ये राहायला गेल्या. त्या जवळपास साडे चार महिने मुंबईतील नटराज हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या. राज यांच्या पत्नीला परत आणण्यासाठी वैजयंती यांनी त्यांची मनधरणी केली होती. राज आणि वैजयंती यांनी विनंती केल्यानंतर कृष्णा घरी परत आल्या पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली. त्यांनी राज यांना वैजयंती मालांसोबत कधीही काम न करण्याची अट घातली. 'संगम' चित्रपटानंतर राज आणि वैजयंती यांनी कुठल्याच चित्रपटात एकत्र काम केलं नाही. साल १९६८ साली वैजयंती यांनी चमनलाल बाली यांच्यासोबत विवाह केला, त्यांना एक मुलगादेखील आहे. त्याच नाव सुचिंद्र बाली आहे. वैजयंती यांनी 'नई दिल्ली', 'नया दौर', 'आशा' सारख्या हिट चित्रपटात काम केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/315Z5UC