Full Width(True/False)

देवमाणूस मालिकेतील मंजुळा अभिनेत्रीच नाही तर आहे उद्योजिकाही आहे; स्वत:च केला खुलासा

भूमिकेचं आव्हानअपूर्वाला काही कारणास्तव मालिका सोडावी लागल्यानं ‘पम्मी’ ही भूमिका प्रतीक्षाकडे आली. त्या विषयी ती म्हणाली, ‘अपूर्वानं पम्मीला ओळख मिळवून दिली. आता ती पुढे नेणं माझी जबाबदारी आहे. ही भूमिका स्वीकारताना माझी अभिनयशैली आणि साकारण्याची ढब वेगळी असेल, हे मी स्पष्ट करतच भूमिका स्वीकारली. जेव्हा कुणी साकारलेली भूमिका तुमच्याकडे येते, तेव्हा तुलना आणि टीका अटळ असते. ही भूमिका साकारण्याचं आव्हान मला आवडलं; कारण मी आधी साकारलेल्या मंजुळापेक्षा पम्मी फारच वेगळी आहे. या भूमिकेच्या अभ्यासासाठी मी बॉलिवूडच्या करिना कपूर, राणी मुखर्जी यांचे व्हिडीओ पाहिले. माझे सहकलाकार आणि टीम खूप प्रेमळ आहे. आम्ही नगरमध्ये शूटिंग करतोय; पण या मालिकेची टीम ही आता कुटुंबाचा भागच झाली आहे.’ आवडीतून अभिनयाकडेपुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये विज्ञान शाखेची विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट, ज्युदो खेळाडू, नृत्य, कॉलेज उपक्रमांसाठी पत्रकारिता, एएफएमसीची परीक्षा देणं, हे सगळं करताना अभिनयाकडे कशी वळलीस असं विचारताच ती म्हणाली, ‘सुमित म्युझिकसाठी काम केलं आणि सह्याद्री वाहिनीवर मालिका मिळाली. पुढे महेश मांजरेकरांचं एक नाटक आणि इतर नाटकांतून रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला. नंतर मालिकांकडे वळले. यश, पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. मनोरंजनसृष्टी ही कधीच कुणासाठी थांबत नाही. इथं संधींचा योग्य वापर करून घेणं जमायला हवं. अभिनयासह हेअर सलून, ब्यूटी इन्स्टिट्यूट आणि कन्स्ट्रक्शन असं उद्योजिका म्हणूनही माझं काम सुरू आहे.’ सोशल मीडियानं काम मिळतं?सोशल मीडियावर ब्ल्यू टीक मिळवायला कलाकार धडपडत असतात. उत्तम फॅनफॉलोइंग असूनही प्रतीक्षाला त्याची गरज वाटत नाही. ती म्हणते, ‘सोशल मीडियावर तुम्ही आहात, तुम्हाला भरमसाठ फॉलोअर आहेत म्हणून तुम्हाला काम मिळतं का? मला वाटतं त्यापेक्षा कामातून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. सोशल मीडिया गरजेपुरता बरा आहे. तुमचं वैयक्तिक आयुष्य हे तसंच राहायला हवं. मला माझ्या आयुष्यातला खासगीपणा जपणं महत्त्वाचं वाटतं. लॉकडाउनमध्येही सोशल मीडिया वगळून मी नात्यांना वेळ देणं, ध्यानधारणा, योग याकडे लक्ष दिलं. मालिका हे माध्यम मला मनापासून आवडतं आणि म्हणूनच मी त्यात रमले आहे. रंगभूमी हे प्रत्येक कलाकराचं स्वप्नं असतं; मात्र ते किंवा चित्रपटांपेक्षा मालिका ही माझी पहिली आवड आहे. रोज काम असणं आणि भूमिकेचे विविध पैलू आजमावण्याची संधी, हे त्याचं कारण आहे.’ कोणतं क्षेत्र सुरक्षित?मनोरंजनसृष्टीतल्या असुरक्षित वातावरणाबद्दल विशेषतः नव्या मुलींना काम मिळण्यासाठी करावी लागणारी धडपड या मुद्द्यावर प्रतीक्षा ठामपणे तिचं मत मांडते. ती म्हणाली, ‘आज कुठलं क्षेत्र मुलींसाठी सुरक्षित आहे? ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या घटना चव्हाट्यावर येतात, त्यांचा गवगवा होतो म्हणून या क्षेत्राला सर्वाधिक नावं ठेवली जातात. खरं तर प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात काही घटना घडत असतातच. तुम्ही स्वतःला कसं सादर करता, कोणत्या वर्तुळात वावरता आणि तुमच्या मतांवर किती ठाम राहता, यावर सगळं अवलंबून असतं. सुरुवातीला या क्षेत्रात यायला मलाही विरोध झाला; मात्र आता पाठिंबा मिळतोय. पालकांनी मुलींना प्रोत्साहन द्यायला हवं.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kRedhW