Full Width(True/False)

'महाभारत'च्या लोकप्रियतेनंतर फिरोज खान यांनी बदललं होतं नाव

मुंबई: ''मध्ये अर्जुनची भूमिका साकरणारे अभिनेता यांनी 'मेहंदी', 'राजा की आएगी बरात', 'जिगर', 'तिरंगा' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळीच छाप सोडली आहे. पण फिरोज यांना सर्वाधिक लोकप्रियता ही महाभारतमधील अर्जुनच्या भूमिकेनंच मिळवून दिली होती. बी आर चोप्रा याच्या महाभारतमध्ये फिरोज यांनी श्रीकृष्ण भक्त अर्जुनाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्यच बदलून गेलं. इतकंच नाही तर या भूमिकेनंतर लोक त्यांचं नाव विसरून त्यांना या नावानेच हाक मारू लागले होते. 'रामायण'प्रमाणेच 'महाभारत' हा शो सुद्धा खूप लोकप्रिय टीव्ही आहे. या शोसाठी बी आर चोप्रा यांनी एक-एक भूमिका लक्षात ठेवून कास्टिंग केली होती. या शोचे ९४ एपिसोड प्रसारित झाले. प्रत्येक एपिसोडमध्ये अशाप्रकारे उत्साह असायचा की, सर्वजण आपलं काम सोडून कुटुंबासोबत 'महाभारत' पाहायला बसत असत. एका मुलाखतीत फिरोज खान म्हणाले होते की, महाभारताचे पटकथा लेखक राही मासूम रझा यांच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःचं नाव अर्जुन ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं, अर्जुनच्या भूमिकेसाठी २३ हजार अभिनेत्यांनी ऑडिशन दिली होती. पण त्यातून फिरोज खान यांनी अर्जुनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये अर्जुन नावाची कोणी अभिनेता नसल्यानं त्यांना रझा यांचं बोलणं पटलं होतं. फिरोज खान यांनी साकारलेली अर्जुनची व्यक्तिरेखा एवढी लोकप्रिय झाली की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा त्यांचं खरं नाव विसरून गेले होते. फिरोज यांची आई सुद्धा त्यांना अर्जुन या नावानेच हाक मारत असे. त्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. अर्जुन या नावाने त्यांना ते सर्व यश दिलं होतं ज्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vLDMGd