मुंबई: परिणिती चोप्राचा 'द गर्ल ऑन द ट्रेन' काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. चित्रपटाच्या रिलीजनंतर त्याचं खूप कौतुकही होताना दिसत आहे. २६ फेब्रुवारीला रिलीज झालेला हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या चित्रपटातील परिणितीच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं जात आहे. एवढंच नाही तर प्रियांका चोप्रानं सुद्धा तिच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पण सध्या अमेरिकेतही चोप्रा सिस्टर्सचा बोलबाला असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेत नेटफ्लिक्सवर आणि यांचे नुकतेच रिलीज झालेले चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये आहेत. प्रियांका चोप्राचा 'वी कॅन बी हीरोज' नेटफ्लिक्सवर सध्या सहाव्या क्रमांकवर तर 'द गर्ल ऑन द ट्रेन' सातव्या क्रमांकावर ट्रेंडिंगमध्ये आहे. परिणितीनं तिच्या एका चाहत्याचं ट्वीट रिट्वीट करत यात प्रियांका चोप्राला सुद्धा टॅग केलं. भारतातही नेटफ्लिक्सवर 'द गर्ल ऑन द ट्रेन' पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. याशिवाय प्रियांकांचा 'द वाइट टाइगर' नुकताच टॉप १० ट्रेंडमधून बाहेर गेला आहे. पण तरीही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. वर्कफ्रंट बोलायचं तर प्रियांका चोप्रा शेवटची राजकुमार रावसोबत 'द वाइट टाइगर' मध्ये दिसली होती. तर परिणिती लवकरच 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात तिच्यासोबत अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तिच्याकडे सायना नेहवालचा 'सायना' बायोपिक सुद्धा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sC9wel