मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं जून २०२० मध्ये आत्महत्या केल्यानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या नावाची बरीच चर्चा झाली. NCB ने सुद्धा रियावर सुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवल्याचं आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर रियावर अनेक आरोप करण्यात आले, चौकशी झाली, सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. एवढंच नाही तर ड्रग्स प्रकरणी तिला तुरुंगातही जावं लागलं. त्यानंतर तिनं मीडियासमोर येणं टाळलं. सोशल मीडियावरून दूर गेली. पण मागच्या काही काळापासून '' चित्रपटामुळे रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चेहरे या चित्रपटाची काही पोस्टर्स मागच्या काही दिवसांत रिलीज झाली. मात्र या पोस्टर्सवर मात्र कुठेच दिसली नाही. याशिवाय प्रमोशन कॅम्पेन मधूनही तिचं नाव वगळण्यात आलं. त्यामुळे आता रिया या चित्रपटाचा भाग आहे का नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावर आता चित्रपटाचे निर्माते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मिड डे'नं दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा रियाबाबत 'चेहरे'चे निर्माते आनंद पंडित यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याबाबत थेट बोलणं टाळलं. योग्य वेळ आल्यावर याबाबत नक्की बोलू असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही आता रिया चक्रवर्तीबाबत कोणतही भाष्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आता या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. या प्रश्नचं उत्तर मी योग्य वेळी नक्की देईन. आता मी याबाबत जास्त काही बोलू शकत नाही.' 'चेहरे'मध्ये अभिनेता अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्यासोबतच अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा रघुवीर यादव, धृतमान चटर्जी आणि सिद्धांत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रूमी जाफरी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर १८ मार्चला रिलीज होणार आहे. तर हा चित्रपट येत्या ९ एप्रिलला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Qf1tGA