मुंबई- छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका '' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २१ मार्च रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार असून मालिकेतील डॉक्टर म्हणजेच देवीसिंगला पोलीस कसे पकडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. 'लागीरं झालं जी' मध्ये भय्यासाहेबांची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेला अभिनेता या मालिकेत देवीसिंगची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील किरणच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येतंय. मालिकेचा शेवट कसा होणार? पोलिसांना सत्य कसं समजणार? ते देवीसिंगला कसे पकडणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अल्पावधीत लोकप्रिय झालेली 'देवमाणूस' ही मालिका सत्य घटनेवर आधारित आहे. मालिकेत दाखवलेली घटना सातारा तालुक्यात घडली होती. साताऱ्यातही एका व्यक्तीने डॉक्टरचं खोटं सोंग घेऊन १३ वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवत त्यांची हत्या केली. मालिकेतही हीच कथा दाखवण्यात आली असून पुढे एक व्यक्ती पोलिसांना डॉक्टरचं देवीसिंह असल्याचं सांगतो. त्यानुसार पोलीस डिंपलची चौकशी करतात. ती देखील घाबरून सर्व सत्य पोलिसांना सांगते. त्यापूर्वीच देवीसिंग मुंबईला पळून गेलेला असतो परंतु, डिंपलमुळे त्याला गावात परतावं लागतं. गावात साध्या वेशात असलेले पोलीस त्याला पकडतात. त्यानंतर पोलीस त्याला तुरुंगात टाकून त्याच्याकडून सत्य जाणून घेतात. खऱ्या आयुष्यातील देवीसिंगला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे सापळा रचून पकडलं होतं. रविवार २१ मार्च रोजी २ तासांच्या विशेष भागासह मालिकेचा शेवट होणार आहे. त्यानंतर वाहिनीवर दाखवण्यात आल्याप्रमाणे 'देवमाणूस' मालिकेच्या जागी 'रात्रीस खेळ चाले ३' सुरु होणार आहे. या मालिकेत अण्णा नाईक परत येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eW6iyH