नवी दिल्लीः मोटोरोला लवकरच भारतात आपला बजेट स्मार्टफोन आणि ला लाँच करणार आहे. कंपनीने या दोन्ही फोनची भारतात एन्ट्रीला अधिकृत टीजर जारी केला आहे. कंपनीने नवीन डिव्हाइसच्या इंडिया लाँचला आपल्या ट्विटर हँडलवरून टीज करताना #AsliAllRounders सांगितले आहे. मोटोच्या या दोन्ही बजेट स्मार्टफोनची टक्कर मार्केटमधील शाओमी, रियलमी आणि सॅमसंगच्या बजेट स्मार्टफोनशी होणार आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने मोटो G10 आणि G30 ला युरोपमध्ये लाँच केले होते. वाचाः दोन्ही स्मार्टफोनमध्ये मिळणार एलसीडी स्क्रीन दोन्ही स्मार्टफोनमध्ये 720X1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी पॅनेल दिले आहे. मोटो जी १० चे डिस्प्ले 60Hz आणि G30 चे 90Hz रिफ्रेश रेट सोबत येते. फोनच्या डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइन आणि मोठे बेजलचे आहेत. वाचाः स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉयड ११ ओएस दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ पर्यंत इंटरनल स्टोरेज येतात. प्रोसेसर म्हणून मोटो जी १० मध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ४६० आणि मोटो जी ३० मध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. २० वॉट फास्ट चार्जिंग सोत येते. अँड्रॉयड ११ ओेएस चालणाऱ्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वाय फाय, ब्लूटूथ ५.०, एनएफसी आणि यूएसबी सी पोर्ट दिले आहेत. वाचाः स्मार्टफोनमध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा फोटोग्राफीसाठी मोटो जी १० मध्ये चार रियर कॅमेरा मिळणार आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. मोटो जी ३० मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअफ मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sTDCue