मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तीस हजार पानांचं हे आरोपपत्र असल्याची माहिती समोर आली आहे.तीस हजार पानांच्या आरोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे. मुंबई एनसीबी टीमनं मुंबई सेशन्स कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्जसंदर्भात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर एनसीबीनं या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. तब्बल सात ते आठ महिने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यानंतर अनेक पुराव्यांच्या आधारे एनसीबीनं हे आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात ३३ जणांची नावे आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण ३३ आरोपी असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. यामध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचा जबाब आहे, परंतु आरोपी म्हणून नाव नाही. मात्र धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कर्मचारी क्षितिज प्रसाद, अर्जुन रामपालचा मेव्हणा अजीसीलाओस दिमिटरीटास याचेही नाव आहे अशी माहिती एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. आरोपत्रात रियाच्या नावाचाही समावेशएनसीबीकडून तयार करण्यात आलेल्या या आरोपपत्रात एकूण ३३ जणांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची नावं देखील आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा रियाच्या अडचणी वाढवण्याच्या शक्यता आहेत. महिनाभर होती तुरुंगात मृत्यू व त्यासोबतच समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणी रियाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती महिनाभर रिया भायखळा येथील तुरुंगात होती. त्यानंतर तिला जामिन मंजूर करण्यात आला होता. तपास वेगानेसुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर ' 'च्या (एनसीबी) पथकाने मुंबईपाठोपाठ पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rikHIU