Full Width(True/False)

Ok Computer: जॅकी श्रॉफ यांच्या वेब सीरिजचा थक्क करणारा ट्रेलर

मुंबई: आनंद गांधी यांची नवी वेब सीरिज ''चा बहुचर्चित ट्रेलर अखेर रिलीज झाला. , यांच्या प्रमुख भूमिका असेलेल्या या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा आणि रसिका दुग्‍गल हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजची कथा भविष्यातली आहे आणि हा ट्रेलर अखेर सर्वांच्या मनात एक आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स म्हणजे रोबोट कोणाची हत्या करू शकतो का? हा प्रश्न अनुत्तरित सोडून जातो. या वेब सीरिजची कथा २०३१ मधील आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक आवाज ऐकू येतो. भविष्यात आपलं स्वागत आहे. ट्रेलरमध्ये दिसत की, एका कार दुर्घटनेत एका व्यक्तीची हत्या केली जाते. सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सीवर या खूनाचा आरोप होतो. अशात प्रश्न पडतो की, जर टॅक्सी कोणी माणूस चालवत नव्हता तर मी खून केला कोणी? या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा एका सायबर सेलच्या एजंटच्या भूमिकेत आहे. तो पोलिसांना मदत करत आहे. ज्यामुळे खुनी लवकरात लवकर पकडला जाईल. तर राधिका आपटे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारी कर्मचारी आहे. जी रोबोटवर काम करते. तिच्या मते रोबोट कधीच कोणाला इजा पोहोचवत नाही. ट्रेलरमध्ये सर्वात रंजक आहे जॅकी श्रॉफ यांची व्यक्तीरेखा. ते एका वेगळ्याच लुकमध्ये सर्वांसमोर येतात आणि दावा करतात की, त्यांनी हा खून केला आहे आणि याला टेक्‍नोलॉजी जबाबदार आहे. 'शिप ऑफ थीसिस'नंतर आनंद गांधी यांनी आणखी एक मजेदार काहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ही वेब सीरिज येत्या २६ मार्चला ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिज बद्दल बोलताना आनंद गांधी म्हणतात, 'ओके कॉम्प्युटर हा एक भविष्याच्या कल्पनेचा प्रयत्न आहे. जो एक प्रश्न उपस्थित करतो की जर एखाद्या आर्टिफ‍िश‍ियल इंटेलि‍जेन्स अर्थात रोबोटनं एखाद्या व्यक्तीचा खून केल्यास या गुन्ह्याला जबाबदार कोण असणार?'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PQcBJP