Full Width(True/False)

५ कॅमेरे, ३० वॅट फास्ट चार्जिंग सोबत Oppo A94 स्मार्टफोन लाँच

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी ओप्पोने मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. फ्लूइड ब्लॅक आणि फँटसी पर्पल कलर ऑप्शनच्या या फोनला कंपनीने सध्या यूएई मध्ये लाँच केले आहे. फोनची किंमत २९९ डॉलर म्हणजेच २१ हजार ८०० रुपये आहे. फोनला ओप्पो यूएईची वेबसाइट लिस्ट करण्यात आले आहे. भारतात हा फोन ८ मार्चला F19 सीरीजच्या डिव्हाइसला लाँच केले जाऊ शकते. वाचाः Oppo A94 चे फीचर आणि वैशिष्ट्ये फोनमध्ये 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोन 60Hz चे रिफ्रेश रेट सोबत स्क्रीन टू बॉडी रेशियो सोबत येते. ४ जीबीच्या LPDDR4x रॅम आणि 128जीबीच्या UFS 2.0 स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P95 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड ColorOS 11.1 वर काम करतो. या फोनमध्ये ३० वॉटची VOOC चार्जिंग सोबत 4,310mAh बॅटरी मिळते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्यूल सिम 4G VoLTE, वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ 5.1 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MRFuEd