Full Width(True/False)

Redmi चा पहिला Smart TV भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः launch date in india: हँडसेट निर्माता कंपनी शाओमीने नुकतीच आपली Redmi Note 10 Series ला लाँच केले होते. आता कंपनी रेडमी ब्रँडचा पहिला स्मार्ट टीव्ही भारतातील ग्राहकांसाठी लाँच करणार आहे. रेडमी इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलरून ट्विट करून कंपनीने आगामी रेडमी टीव्हीच्या लाँचिंगची तारखे संबंधी माहिती दिली आहे. तसेच कंपनीने मीडिया इनवाइट सुद्धा पाठवले आहे. वाचाः कंपनी चिनी मार्केटमध्ये रेडमी टीव्हीची विक्री करीत आहे. परंतु, भारतीय बाजारात रेडमी ब्रँड अंतर्गत आतापर्यंत स्मार्टफोन, पॉवर बँक, ऑडियो अॅक्सेसरीज आणि वियरेबल ला लाँच केले आहे. आता १७ मार्च रोजी दुपारी कंपनी भारतात आपला पहिला रेडमी सीरीजचा टीव्ही मॉडल लाँच करणार आहे. रेडमी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून केवळ लाँचिंगच्या तारखेची माहिती उघड केली आहे. तसेच ही टीव्ही XL एक्सपीरियंस देईल. कंपनी एकत्र अनेक रेडमी टीव्ही मॉडल्सला लाँच करणार की नाही, हे अजून स्पष्ट झाले नाही. की एकच मॉडल बाजारात उतरवणार आहे. वाचाः गेल्या आठवड्यात रेडमी नोट सीरीजच्या कार्यक्रमात शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ही माहिती दिली होती. कंपनी भारतात आपली रेडमी टीव्ही मॉडल्स लाँच करणार आहे. चीनी मार्केटमध्ये रेडमी ब्रँडचे अनेक स्मार्ट टीव्ही मॉडल्सची विक्री होत आहे. परंतु, यात सर्वात लेटेस्ट मॉडल Redmi Max 86 inch आहे. जो 120 हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेट सोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OiwZ5L