Full Width(True/False)

Jio च्या या रिचार्जमध्ये ८४ दिवसांपर्यंत रोज मिळणार १.५ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे अनेक लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. यामध्ये जबरदस्त डेटा आणि कॉलिंग बेनिफिट मिळत आहे. तसेच मोठी वैधता मिळते. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या ८४ दिवसांची वैधता मिळणाऱ्या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सारखे बेनिफिट मिळतो. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ५५५ रुपये आहे. जिओच्या या प्लानमध्ये १.५ जीबी सोबत अन्य टेलिकॉमच्या तुलनेत हा प्लान बेस्ट आहे. वाचाः जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ५५५ रुपये आहे. ज्यात ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना ५५५ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये रोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. याचाच अर्थ एकूण ८४ दिवसांपर्यंत युजर्संना १२६ जीबी डेटा या प्लानमध्ये मिळतो. बाकीच्या प्लानच्या तुलनेत या प्लानमधील डेटा संपल्यानंतर याची स्पीड 64 Kbps होते. डेटाशिवाय, यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग व रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच या प्लानमध्ये जिओ अॅप Jio App चे कॉम्पलिमेंट्री सब्सक्रिप्शन ग्राहकांना दिले जाते. वाचाः जिओच्या तुलनेत Airtel चे ८४ दिवसांच्या प्लानमध्ये १.५ जीबीच्या रिचार्ज प्लानची किंमत ५९८ रुपये आहे. जिओच्या तुलनेत एअरटेलची किंमत जास्त आहे. यात ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस फ्री मिळते. याशिवाय, वोडाफोन आयडियाच्या Vi प्लानमध्ये १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिटच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानची किंमत ५९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cdH3VB