नवी दिल्लीः रिलायन्स जिओने नुकतीच आपली वेबसाइटला रिडिझाइन केले आहे. लीडरशीप करणारी कंपनीने या प्रीपेड प्लानचा खुलासा केला आहे की Super Value, Best Selling आणि Trending कॅटेगरीत येते. ज्या रिचार्ज प्लानला ग्राहकांनी सर्वात जास्त रिचार्ज केले आहे. त्याला बेस्ट सेलिंग कॅटेगरीत येते. वाचाः ब्रॉडबँड आणि टेलिकॉम ऑपरेटर्स प्रीपेड प्लानला कॅटेगरीनुसार लाँच केले आहे. याप्रमाणे आपले ३४९ रुपयांच्या रिचार्जला ट्रेंडिंग टॅगमध्ये ठेवले आहे. याचाच अर्थ या रिचार्ज प्लानला सध्या सर्वात जास्त रिचार्ज केले जाते. कंपनीच्या १९९ रुपये आणि ५५५ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये बेस्ट सेलर्स टॅग सोबत लिस्ट करण्यात आले आहे. जाणून घ्या प्लानसंबंधी. वाचाः Best Sellers लिस्ट मध्ये चार जियो प्लान जिओने बेस्ट सेलर्सच्या यादीत एकूण चार प्लानचा समावेश केला आहे. या यादीत १९९ रुपयांचा जिओ प्लान मध्ये १.५ जीबी डेटा रोज मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ग्राहकांना यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. वाचाः या यादीत दुसरा प्लान आहे ५५५ रुपयांचा. याची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये १.५ जीबी डेटा रोज मिळतो. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. तिसरा प्लान म्हणजे ५९९ रुपयाचा आहे. चौथा प्लान २३९९ रुपयांचा आहे. यात रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानची वैधता अनुक्रमे ८४ दिवस आणि ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज ऑफर केले जाते. Super Value लिस्टमध्ये दोन जिओ प्लान सुपर व्हॅल्यू कॅटेगरीत जिओने २४९ रुपये आणि २५९९ रुपयांच्या प्लान्सचा समावेश केला आहे. २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २ जीबी डेटा रोज मिळतो. याची वैधता २८ दिवसाची आहे. याशिवाय, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग व १०० एसएमएस रोज मिळते. वाचाः २५९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २जीबी डेटा सोबत अतिरिक्त १० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग व १०० एसएमएस रोज मिळतात. जिओ प्लानमध्ये ग्राहकांना विना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता वर्षभरासाठी ३९९ रुपये किंमतीचा डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी मेंबरशीप मिळते. Trending लिस्टमध्ये ३४९ रुपयाचा जिओ प्लान रिलायन्स जिओने आपली ट्रेंडिंग लिस्टमध्ये ३४९ रुपयांच्या प्लानचा समावेश केला आहे. या प्लानमध्ये ३जीबी डेटा रोज मिळतो. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. जिओच्या सर्व प्लानमध्ये ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qjNkE8