मुंबई ः सोनी टिव्हीवर गेल्यावर्षीपासून इंडियन आयडॉल १२ या रिअॅलिटी शो सुरू झाला आहे. सध्या या कार्यक्रमामध्ये दहा स्पर्धक आहेत. परंतु या कार्यक्रमाला टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवाव्या लागत आहेत. खरे पाहता टीआरपीच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हा कार्यक्रम कायमच आघाडीवर होता. परंतु नवीन पर्व सुरू झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाल्याने सादरकर्त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी सादरकर्त्यांना कठोर मेहनत घ्यावी लागणार हे नक्की. 'टीआरपीसाठी काय पण'इंडियन आयडॉल १२ या पर्वाची लोकप्रियता टिकून राहण्यासाठी आणि ती वाढावी यासाठी त्याचे सादरकर्ते ज्या काही युक्त्या लढवत आहेत त्या प्रेक्षकांच्या फारशा आवडलेल्या दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी वाढवण्यासाठी सवाई भाट याच्या गरीबीचा मुद्द्यावरून त्याच्या बद्दल सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न झाला होता. तर सध्या पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्यात कथित प्रेमप्रकरणावरून चर्चा सुरू करण्यात आली आहे. परंतु एका मुलाखतीमध्ये खुद्द पवनदीपने हे सगळे खोटे असल्याचे सांगितले. त्यामुळे हा सर्व टीआरपीसाठी चाललेला असल्याचे समोर आले. त्यामुळे चाहत्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. नाविन्याचा अभावसोनी टिव्हीवरून जेव्हा इंडियन आयडॉल हा रिअॅलिटी कार्यक्रम सुरू झाला होता,तेव्हा त्याचे सादरीकरण, त्यातील स्पर्धकांची गुणवत्ता हे सारे नवीन होते. त्यामुळे त्याची लोकप्रियताही दिवसागणिक वाढत गेली. त्यामुळे या कार्यक्रमा १२ व्या पर्वापर्यंत येऊन पोहोचला. परंतु आता या कार्यक्रमामध्ये कोणता ही नवेपणा उरलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकसंख्याही रोडावू लागली आहे. टीझर, प्रोमोही अनाकर्षकयाशिवाय कार्यक्रमातून मनोरंजक आणि उत्कंठावर्धक असे प्रोमो आणि टिझर सुरुवातीपासूनच दिसलेला नाही. तेच तेच आणि रटाळ असे प्रोमो, टिझर येत असल्याने प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता राहिलेली नाही. सोशल मीडियावर खोटेपणा उघडइंडियन आयडॉल १२ या कार्यक्रमाला चांगला टीआरपी मिळावा यासाठी त्याच्या सादरकर्त्यांनी स्पर्धकांबाबत खोट्या कथा रचून सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. परंतु प्रेक्षकांनी त्या खोट्या असल्याचे सिद्ध केल्याने सादरकर्त्यांचा खोटेपणा उघड झाला. त्यामुळे या खोटेपणामुळे हा कार्यक्रम खोटारडा असल्याची चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमाचे खरेखुरे चाहते होते ते देखील दुरावले जाऊ लागले. तेच ते पाहुणेइंडियन आयडॉल कार्यक्रमाच्या सेटवर अनेक मोठमोठे कलाकार, गायक, संगीतकार पाहुणे म्हणून सहभागी व्हायचे. जो कोणता सिनेमा त्या काळात रिलीज व्हायचा, हिट व्हायचा त्याच्यामधील संबंधित कलाकारांना बोलावले जायचे. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक हा कार्यक्रम आवर्जून बघायचे. परंतु आता ते ही होत नसल्यानेमुळेही प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eV7Bhn