मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सध्या तिचा चित्रपट 'सायना'मुळे चर्चेत आहे. परिणितीचा बहुचर्चित 'सायना' हा बायोपिक नुकताच रिलीज झाला. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. फक्त चाहतेच नाही तर चित्रपट समीक्षकांनीही परिणितीच्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पण बॅडमिंटनपटू 'सायना' मोठ्या पडद्यावर जशीच्या तशी साकारता यावी यासाठी परिणितीला मात्र कठोर परिश्रम करावे लागले होते. ज्याची झलक तिनं व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांना दाखवली आहे. परिणिती चोप्रानं तिच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातून तिनं मोठ्या पडद्यावर कशी साकारली याचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'सायना' हा बायोपिक भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी परिणितीला बराच घाम गाळावा लागला आहे. 'सायना' साकारण्यासाठी तिने दोन वर्ष खास प्रशिक्षणही घेतलं होतं. आपल्या लुकसोबतच तिनं बॅडमिंटनची प्रॅक्टिस सुद्धा केली. परिणितीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यातून तिनं परिणिती ते सायना हा प्रवास सांगितला आहे. परिणिती यासोबत एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यावरून तिनं किती तासांपर्यंत फक्त बॅडमिंटनची प्रॅक्टिस केली असेल याचा अंदाज लावता येतो. यातील बऱ्याच फोटोमध्ये प्रॅक्टिसनंतर थकलेली परिणिती चोप्रा दिसत आहे. चित्रपटाच्या रिलीजनंतर आता परिणितीचे फोटो ट्रेंडिंगवर आहे. ज्यात ती हुबेहूब सायनासारखी दिसत आहे. सायना या बायोपिकचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं आहे. या चित्रपटात परिणिती चोप्रा व्यतिरिक्त मानव कौल, मेघना मालिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'द गर्ल ऑन द ट्रेन', 'संदीप और पिंकी फरार' नंतर 'सायना' हा परिणितीचा सलग तिसरा चित्रपट रिलीज झाला आहे. परिणितीची बहीण प्रियांका चोप्रानंही या चित्रपटातील अभिनयासाठी परिणितीचं कौतुक केलं असून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lWda0q