मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता यांनी नुकतीच कोविड-१९ च्या लशीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. ज्याचा अनुभव त्यांनी एका ट्वीटमधून चाहत्याशी शेअर केला. ज्यात त्यांनी सांगितलं आहे की, व्हीआयपी एंट्रीचा वापर न करता त्यांनी कडक ऊनात सामान्य लोकांप्रमाणेच ३ तास रांगेत उभं राहून लस घेतली. पण त्याच्या या ट्वीटनंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. सतीश शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ' घेण्यासाठी ३ तास रांगेत उभा राहिलो. बीकेसीच्या कडक ऊनात हे काम पूर्ण झालं. बाहेर मला थोडं अस्वस्थ वाटत होतं मात्र आता गेल्यावर सर्व शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडलं. व्हीआयपी प्रवेशाचा वापर न केल्याबद्दल मला थोडा ओरडा बसला. पण आर के लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखं वागून खूप छान वाटलं.' सतीश शाह यांच्या या ट्वीटनंतर काही युझर्सनी लसीकरण केंद्रावरील व्हीआयपी प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका युझरनं सतीश शाह यांच्या ट्वीटवर कमेंट करताना विचारलं, 'जर हा व्हायरस सर्वांवर समान परिणाम करतो तर मग लसीकरण केंद्रावर व्हीआयपी एंट्री का असावी?' युझरच्या या कमेंटला शाह यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं, 'कोणत्याही प्रकारची वेगळी व्हीआयपी एंट्री नव्हती मात्र जेष्ठ नागरिक आणि व्हिलचेअर असलेल्या नागरिकांसाठी मागच्या बाजूला वेगळा प्रवेश होता.' याशिवाय या ट्वीटनंतर काही युझर्सनी सतीश शाह यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. एक युझरनं त्यांचं हे ट्वीट 'साराभाई वर्सेस साराभाई'मधील व्यक्तिरेखेशी जोडून, 'अशा मिडल क्लास वागण्यासाठी माया साराभाई तुम्हाला शिक्षा देईल.' असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. पण यासोबतच काही युझर्सनी मात्र सतीश शाह यांच्या ट्वीटनंतर त्यांच्या या वागण्याचं कौतुकही केलं आहे. व्हीआयपी एंट्री असूनही त्याचा वापर न करता सर्वसामान्यासारखं लसीकरण करून घेण्याचा हा अंदाज सतीश शाह यांच्या चाहत्यांना आवडला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qg44wi