नवी दिल्लीः चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. नवीन स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन ओरिजनल Vivo Y31s चा थोडा बदल केलेला व्हेरियंट आहे. Vivo Y31s Standard Edition व्हेरियंट मीडियाटेक डायमेसिटी ७०० प्रोसेसर सोबत येतो. चिपसेट शिवाय नवीन फोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जाणून घ्या नवीन फोनसंबंधी. वाचाः Standard Edition ची किंमत Vivo Y31s Standard Edition ची चीनमध्ये १६९९ चिनी युआन म्हणजेच १९ हजार १०० रुपये किंमत आहे. फोनला चीनमध्ये लेक लाइट ब्लू, टायटेनिक ग्रे आणि व्हाइस कलर व्हेरियंट मध्ये लाँच केले आहे. या फोनला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले असून ग्लोबल मार्केटमध्ये या फोनला कधीपर्यंत लाँच केले जाणार आहे. यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. विवो वाय ३१ एस च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १४९८ चिनी युआन म्हणजेच १६ हजार ९०० रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६९८ चिनी युआन म्हणजेच १९ हजार २०० रुपयांत लाँच केले होते. वाचाः Vivo Y31s Standard Edition चे फीचर्स Vivo Y31s Standard Edition फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ६.५१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिझाइन सोबत येतो. या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर दिला आहे. ६ जीबी रॅम सोबत हा फोन येतो. Vivo Y31s Standard Edition या फोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा ऑप्शन दिला आहे. वाचाः या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटिंगसाठी Vivo Y31s Standard Edition या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक सारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38bGVVz