Full Width(True/False)

ही पाकिस्तानी अभिनेत्री होती ऋषी कपूर यांची खास मैत्रीण

मुंबई: ख्यातनाम अभिनेता यांची पहिला स्मृतीदिन. ऋषी कपूर हे हिंदी सिनेमासृष्टीमधील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक होते. उत्तम अभिनेते म्हणून ऋषी कपूर ओळखले जायचे तसेच मोठ्या मनाचा माणूस अशीही त्यांची ओळख होती. त्यामुळेच त्यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर देशा-परदेशात होते. त्यांची एक खास पाकिस्तानी अभिनेत्री मैत्रीण होती. देशांच्या सीमांचे बंधन कधीही त्यांच्या मैत्रीच्या आड आले नाही. ही पाकिस्तानी अभिनेत्री म्हणजे . पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार आणि ऋषी कपूर यांनी १९९१ मध्ये रिलीज झालेल्या 'हिना' सिनेमात एकत्र काम केले होते. झेबा यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या मुलाखतीमध्ये झेबा यांनी सांगितले की, ' ऋषी कपूर यांचे निधन होण्याआधी मी रणधीर कपूर यांच्याशी बोलले होते. त्यांनी मला सांगितले की ऋषीची तब्येत सुधारत आहे. त्यानंतर लगेचच ते गेल्याची बातमी आली तो माझ्यासाठी मोठा धक्का होता...' झेबा यांनी या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले , ' ऋषी कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजते. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून मला त्यांचे काम नेहमीच आवडले होते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मला खूप काही शिकवणारा होता. ते आपल्या अभिनयाबाबत कधीही तडजोड करायचे नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकले. हिना सिनेमानंतरही आम्ही दोघेजण एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यावेळेला मोबाइलही नव्हते, संपर्काचे साधन फक्त लँडलाइन फोन होते. तेव्हापासून आमचा संपर्क होता.' त्यांचा दिवाळीच्या सुमारास वाढदिवस असायचा त्यामुळे वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना लँडलाइनवरच फोन करायचे. त्यानंतर मोबाइल आले आणि आम्ही व्हॉटसअपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असायचो. जेव्हा त्यांचा मुलगा रणबीरने सिनेमात पदार्पण केले तेव्हा त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. त्यानंतर त्याच्या प्रत्येक सिनेमा रिलीज व्हायचा तेव्हा ते मला मेसेज करायचे आणि सिनेमा बघायला सांगायचे. मी त्यांना १० वर्षांपूर्वी भारतात येऊन भेटले होते. त्यानंतर आम्ही फोनवरूनच एकमेकांच्या संपर्कात असायचो. ' ऋषी कपूर यांचे गेल्यावर्षी ३० एप्रिल २०२० मध्ये मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये निध झाले. ऋषी कपूर यांना २०१८ मघ्ये कॅन्सर झाल्याचे निदान समोर आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. सप्टेंबर २०१९ मध्ये ते भारतात परत आले. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. एका सिनेमाच्या चित्रिकरणासाठी ते दिल्लीला गेले होते. तिथेच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईत रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SinaXh