मुंबई: गायिका आणि याच्या लव्हस्टोरीचे किस्से एकेकाळी खूपच चर्चेत होते. या दोघांना बॉलिवूडची सर्वात क्यूट जोडी मानलं जात होतंय नॅशनल टेलिव्हिजनवर प्रेमाची कबूली दिल्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही खूप झाल्या. पण त्यानतंर काही महिन्यांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि २०१८ मध्ये दोघंही वेगळे झाले. नेहानं याबाबत कोणतीही गोष्ट लपवली नाही. सोशल मीडियावर तिनं ब्रेकअप झाल्याचीही कबुली दिली मात्र दुसरीकडे हिमांशनं यावर गप्प राहणंच पसंत केलं होतं पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मात्र त्यानं या विषयावर अखेर मौन सोडलं. एका मुलाखातीत जेव्हा हिमांशला नेहसोबतच्या ब्रेकअपबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं एवढे दिवस या विषयावर न बोलता गप्प राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं. याविषयी बोलताना हिमांश म्हणाला, 'हे माझं ब्रेकअप होतं. मी संपूर्ण जगाला याबाबत सांगत का फिरावं. माझ्या घरात काय घडतंय याचा इतरांशी काय संबंध आहे आणि लोकांना याबाबत एवढी उत्सुकता का आहे हे मला समजलेलं नाही.' हिमांश पुढे म्हणाला, 'हे सर्व २०१८ पासून सुरू आहे. मी नेहाला सुद्धा याचा दोष देत नाही. ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. तिच्या आयुष्यात खूश आहे. मी माझ्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. पैसे कमावत आहे. सर्वांचं मनोरंजन करत आहे. पण २०२१ मध्ये जगत असताना काही लोक मात्र अजून त्याच ठिकाणी अडकले आहेत. याबाबत आपण काहीच करू शकत नाही. काही लोकांना वाटतं की मी काही चुकीचं वागलो आहे. पण मी असं काहीही केलेलं नाही.' हिमांशनं म्हटलं, 'मी जर कोणासोबत काही चुकीचं केलं तर माझ्या आयुष्यात शांतता असली नसती. मी शांतपणे झोपू शकले नसते. पण याचा अर्थ असा नाही की, मी सर्वांना याचं काय बरोबर आणि काय चुकीचं याचा हिशोब देऊ. नेहाला त्यावेळी जे ठीक वाटलं तिनं केलं, ती रागात होती. तिनं काही पोस्ट केलं असेल. मी पण रागात होतो पण मी शांत राहणं पसंत केलं. आता कोण जास्त टॉक्सिक आहे? हे लोक टॉक्सिक आहे जे जबरदस्ती तुम्हाला त्यासाठी जबाबदार मानत असतात. मी कोणाची तक्रार करत नाही. त्यासाठी मी यावर कधीच काही बोललो नाही. आम्ही दोघंही एकसमान होतो, प्रेम नव्हतं आणि आता तिरस्कारही नाहीये.' नेहा कक्करनं हिमांश कोहलीशी ब्रेकअप झाल्यानंतर मागच्याच वर्षी रोहनप्रीत सिंहशी लग्न केलं. सोशल मीडियावर या लग्नाच्या जोरदार चर्चा सुद्धा झाल्या होत्या. सध्या नेहा इंडियन आयडॉल १२ मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QC1JA6