Full Width(True/False)

'सगळं ठाऊक आहे तर मदत का नाही करत? देवोलीना भट्टाचार्जीने साधला कंगनावर निशाणा

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर करत देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. ऑक्सिजन आणि बेड्स बद्दलदेखील चर्चा केली होती. त्यावर अभिनेत्री राखी सावंतने कंगनाला तू कोट्यवधींची मालकीण आहेस मग देशसेवेसाठी काहीतरी खर्च कर, असा सल्ला दिला होता. आता 'बिग बॉस' फेम देवोलीना भट्टाचार्जीने देखील कंगनाला सुनावलं आहे. देवोलीना तिच्या घराबाहेर आली असताना पत्रकारांनी तिला काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तर देत असताना तिने कंगनाला सोनू सूदप्रमाणे इतरांची मदत करण्याचा सल्ला दिला. एका पत्रकाराने देवोलीनाला सांगितलं, ' म्हणतात की, औषध, बेड्स आणि ऑक्सिजनची काहीच कमी नाहीये.' त्यावर उत्तर देताना देवोलीना म्हणाली, 'असू शकतं की तीच्यासाठी या गोष्टी उपलब्ध असतील, पण इथे लोक ऑक्सिजनशिवाय आणि बेडशिवाय मरत आहेत. जर कंगनाला माहित आहे की बेड्स, ऑक्सिजन आणि लस कुठे मिळतेय तर तिने पुढे यावं आणि सोनू सूद प्रमाणे इतरांची मदत करावी. जशी इण्डस्ट्रीचे बाकीचे लोक करत आहेत. इस्पितळांचे हाल बघा. लोक तडफडून मरत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा आहे, लसींचा तुटवडा आहे. आता तर ऐकलंय की लसदेखील संपल्यात. मग कंगनाने पुढे येऊन सांगावं की लस कुठे मिळते.' कंगनावर निशाणा साधत देवोलीना म्हणाली, 'कंगनाने पुढे यावं. तिने लोकांना सांगावं की, ऑक्सिजन इथे मिळतंय, लस या ठिकाणी उपलब्ध आहे, या इस्पितळात बेड उपलब्ध आहेत. इस्पितळात जिथे जिथे लोकांना अडचण येतेय तिथे कंगनाने स्वतःहून मदत करावी.' करोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक बॉलिवूड कलाकार स्वतःहून मदतीसाठी पुढे आले आहेत. सोनू सूद, अजय देवगन, सुनील शेट्टी यांच्यासारखे कलाकार गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. काहींनी रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करून दिले आहेत तर काहींनी ऑक्सिजन सिलेन्डरचा पुरवठा केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QMGhIt