मुंबई- 'शोले' चित्रपटातील आपल्या केमिस्ट्रीने सगळ्यांना वेड लावणारी जोडी म्हणजे आणि . धर्मेंद्र आणि हेमा यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांना एकत्र पाहायला प्रेक्षकांना आवडतं. परंतु, गेलं वर्षभर धर्मेंद्र आणि हेमा मात्र एकमेकांपासून दूर राहत आहेत. हेमा त्यांच्या मुंबईतील घरी आहेत तर धर्मेंद्र त्यांच्या फार्महाउसवर त्यांच्या टीमसोबत राहत आहेत. हेमा आणि धर्मेंद्र यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आता हेमा यांनी त्यांच्या या निर्णयामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. हेमा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या निर्णया मागचं कारण सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, 'हा सगळ्यात जास्त सोपा आणि उत्तम उपाय आहे त्यांना सुरक्षित ठेवण्याचा. सध्या आमच्यासाठी त्यांचं आरोग्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आम्हाला या दिवसांमध्ये त्यांची काळजी घेण्यावर जास्त भर दिला पाहिजे मग त्यासाठी मला कशाचा त्याग करावा लागला तरी चालेल.' हेमा यांनी हा निर्णय बाहेरची करोनाची परिस्थिती पाहून घेतला आहे. धर्मेंद्र यांना करोनाची लागण होऊ नये, ते इतरांच्या संपर्कात येऊ नयेत, यासाठी त्यांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र यांचं वय बघता त्यांना करोनाचा धोका जास्त असल्याने हेमा यांनी त्यांच्या आरोग्याला जास्त महत्व दिलं आहे. धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वीच करोनाची पहिली लस टोचून घेतली आहे. त्यासोबतच त्यांनी सगळ्यांना लस टोचून घेण्याचं आवाहनही केलं होतं. धर्मेंद्र मागचं संपूर्ण वर्ष त्यांच्या फार्महाउसवर राहत आहेत. धर्मेंद्र यांच्या तब्येतीची काळजी वाटत असल्याने त्यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरणही बंद ठेवण्यात आलं आहे. याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणले, 'आम्हा कोणालाच वाटत नाही की चित्रपटामुळे धर्मेंद्र यांचं आरोग्य धोक्यात यावं. त्यामुळे चित्रपटाचं चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे. शिवाय पूर्वी चित्रीकरण पंजाबमध्ये करण्याचं ठरलं होतं परंतु, आता ते लंडनमध्ये केलं जाणार आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e5oncP