Full Width(True/False)

करोनात 'त्या' ट्वीटमुळे फसला वरुण धवन, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मुंबई: सध्या देशभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. ज्याचा फटका बॉलिवूडला सुद्धा बसला आहे. महाराष्ट्रात तर चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे. असं असताना अभिनेता मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये आगामी चित्रपट 'भेडिया'चं शूटिंग करत आहे आणि या दरम्यान तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. पण नुकतंच त्यानं एक ट्वीट केलं होतं ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल व्हावं लागलं आणि नंतर वरुणनं ते ट्वीट डिलिट केलं. वरुण धवननं नुकतंच्या त्याच्या ट्विटरवर एक ग्राफिक्स शेअर केलं होतं. ज्यात तो वेगवेगळ्या अवतारात दिसत होता. हे ग्राफिक त्याच्या एका चाहत्यानं त्याला पाठवलं होतं. पण काही वेळातच वरुणला हे ग्राफिक ट्विटरवरून डिलिट करावं लागलं. देशात करोनाची दुसऱ्या लाटेनं एवढ्या लोकांचा जीव घेतलेला असताना वरुणचं अशाप्रकारे ग्राफिक शेअर करणं युझर्सना आवडलेलं नाही आणि त्यांनी त्याला जोरदार ट्रोल केलं आहे. वरुण धवननं शेअर केलेलं हे ग्राफिक वरुण धवनच्या येत्या वाढदिवसाच्या दृष्टीकोणातून तयार करण्यात आलं होतं. ज्यात त्याच्या चित्रपटातील त्याचे विविध लुक दाखवण्यात आले होते. यासोबत एक मेसेज सुद्धा लिहिण्यात आला होता. ज्यात लिहिलं होतं, 'प्लाझ्मा दान करा आणि जीव वाचवा.' वरुणनं हे ग्राफिक सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर युझर्सनी या पोस्टच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत त्याला ट्रोल केलं. ही पोस्ट तेव्हा करण्यात आली जेव्हा सोशल मीडियावर सध्या ऑक्सिजन, औषध आणि हॉस्पिटल बेड यांची कमतरता अशा विषयांवर बोललं जात आहे. वरुणच्या या ट्वीटवर टीका करताना एका युझरनं लिहिलं, ओह वरुण मला वाटलं होतं की, तू एक समजदार व्यक्ती आहेस. यावर वरुण सुद्धा या युझरला उत्तर दिलं आहे. त्यानं लिहिलं, 'मी हे फक्त त्याच्यासाठी केलं ज्यानं हे ग्राफिक तयार केलं आणि मला पोस्ट करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती. पण आता मला वाटतं हे मीडियम आता यासाठीही वापरलं जाऊ नये.' यानंतर वरुणनं ते ग्राफिक्सचं ट्वीट डिलीट केलं. वरुणच्या या ट्वीटला अनेकांनी बालिश म्हटलं आहे. याशिवाय लोक त्या बॉलिवूड स्टार्सनाही सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. जे देशात करोना व्हायरसची भयानक परिस्थिती असताना परदेशात जाऊन व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32D0hzC