मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं चित्रपटांचं शूटिंग संपवून आपल्या लॉन्ग व्हेकेशनचा आनंद घेतला. आधी लॉस एंजेलिस आणि नंतर मालदीव अशी मोठी सुट्टी एन्जॉय करून जान्हवी आता मुंबईमध्ये परतली आहे. दरम्यान तिनं या व्हेकेशनचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्रामवर फ्लोरल बिकीनी फोटो शेअर केले ज्यावरून तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. इन्स्टाग्रामवर फ्लोरल बिकीनी फोटो शेअर करताना जान्हवीनं त्याला आयलँड गर्ल असं कॅप्शन सुद्धा दिलं आहे. जान्हवीच्या या फोटोवर २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. पण या फोटोंमधील तिचा अंदाज पाहून काही युझर्सनी तिला ट्रोल सुद्धा केलं आहे. या फोटोमध्ये बिकिनीवर दोन वेण्या आणि जीभ बाहेर काढून चिडवताना दिसत आहे. यांचा कमल हसन यांच्यासोबतचा चित्रपट 'सदमा'मध्येच हुबेहूब लुक होता. त्यामुळे जान्हवीचा हा लुक पाहिल्यानंतर चाहत्यांनी श्रीदेवी यांची आठवण झाली. जान्हवी कपूरच्या या फोटोवर कमेंट करत अनेक युझर्सनी तिच्यावर टीका केली आहे. एका युझरनं लिहिलं, 'असे अश्लील फोटो का पोस्ट करत आहेस.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'खूपच वाईट' याशिवाय आणखी एका युझरनं जान्हवीच्या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं, 'थोडी लाज बाळग, तू श्रीदेवी यांची मुलगी आहेस. त्यांच नाव खराब करत आहे.' मालदीव हे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचं आवडतं ठिकाण आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर जान्हवीच्या फोटोंची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. जान्हवीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच तिचा 'रूही' चित्रपट रिलीज झाला होता. ज्यात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. याशिवाय आगामी काळात तिच्याकडे 'गुड लक जेरी','तख्‍त' आणि 'दोस्‍ताना २' हे चित्रपट आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mHgkFR