Full Width(True/False)

रुग्णांना अक्षरशः खुर्च्यासुद्धा उपलब्ध नाहीत; अशोक शिंदेंनी सांगितला अनुभव

मुंबई टाइम्स टीम आपल्या अभिनयकौशल्यानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे आणि फिटनेससाठी ओळखले जाणारे अभिनेते यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. सध्या 'स्वाभिमान' या मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेचं चित्रीकरण करत असताना ते आजारी पडले आणि कसलाही वेळ न दवडता त्यांनी लगेच उपचारासाठी पावलं उचलली. आजूबाजूची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नव्हते. रुग्णांना अक्षरशः खुर्च्यासुद्धा उपलब्ध नाहीत हे पाहून त्यांनी धडपड केली आणि अखेरीस गोरेगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये स्वतःला दाखल करून घेतलं. ‘तुम्हाला थोडं जरी बरं वाटत नसेल तरी ताबडतोब उपचार घ्या. कारण उपचार घेण्यासाठी वेळ लागला तर हे जीवावर बेतू शकतं’, अशी विनंती त्यांनी केली. अशोक यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी इतरांना काळजी घेण्यास सांगितलं. 'या परिस्थितीत सर्वांनीच थोडी कळ सोसावी आणि सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे. हे संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे. आपला जीव शाबूत असेल तरच आपण कोणतीही लढाई लढू शकतो. त्याचबरोबर सरकारनं परवानगी दिली तर सिनेमे, मालिकांच चित्रीकरणसुद्धा संपूर्ण टीमनं लसीकरण केल्यावरच करावं. त्यामळे धोका थोडा कमी होईल', असंही ते म्हणाले. अशोक नित्यानियमाने व्यायाम करत असल्याने त्यांची तब्येत लवकर सुधारत गेली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tDqRVj