Full Width(True/False)

नानाविध केल्या भूमिका, पण सीआयडीने मिळवून दिली घराघरात ओळख

मुंबई- अभिनेते यांचा मनोरंजनसृष्टीतील प्रवास खूप मोठा आहे. त्यांनी 'वास्तव', 'गुलाम-ए- मुस्तफा,' 'सूर्यवंशम', 'नायक', यांसारख्या ३५ हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय मराठी आणि इंग्रजी सिनेमांतही काम केले आहे. दूरदर्शवरून प्रसारित होणारी 'एक शून्य शून्य' मालिकेतील शिवाजी साटम यांनी साकारलेली एसीपी श्रीकांत पाटकर ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. शिवाजी साटम यांनी १९८० मध्ये 'रिश्ते नाते' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. त्यानंतर ते 'फेमस ट्रायल्स ऑफ इंडिया'मध्येही दिसले होते. त्यानंतर त्यांनी 'एक शून्य शून्य' या लोकप्रिय मराठी मालिकेत काम केले. या मालिकेला तुफान यश मिळाले आणि त्यानंतर शिवाजी साटम यांनी मागे वळून पाहिले नाही. शिवाजी साटम यांनी जरी अनेक हिंदी- मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केले असले तरी खऱ्या अर्थाने घराघरांत लोकप्रियता मिळाली ती '' या मालिकेमुळे. या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न ही त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. सीआयडी ही मालिका १९९७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली. या मालिकेने टीव्ही क्षेत्रातील अनेक रेकॉर्ड तोडले. तसेच यात शिवाजी साटम यांनी साकारलेली एसीपी प्रद्युम्न या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. २०१३ मध्ये साटम यांनी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी म्हणून या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला परंतु लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी परत मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. अभिनेते शिवाजी यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीमध्ये सात वेळा पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे. शिवाजी साटम यांच्याबाबत असे सांगितले जाते की, सीआयडीमध्ये काम करण्याच्याआधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एक घटना घडली होती. मनोरंजन विश्वात येण्याआधी शिवाजी साटम बँकेमध्ये कामाला होते. त्यावेळची ही गोष्ट आहे. जेव्हा त्यांची एका प्रकरणात पोलिसांशी गाठ पडली होती तेव्हा पोलिसांना त्यांनी खूप मदत केली होती. त्यानंतर शिवाजी साटम सीआयडी मालिकेत काम करू लागले. अनेक पिढ्यांनी या मालिकेला तितकेच प्रेम दिले. बीपी सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ही मालिका टीव्हीच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेली मालिका होती. या मालिकेचा पहिला भाग २३ वर्षांपूर्वी म्हणजे २१ जानेवारी १९९८मध्ये प्रसारित झाला आणि ती मालिका २०१८ पर्यंत सुरू होती. २७ ऑक्टोबर २०१८ ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. दरम्यान, शिवाजी साटम यांनी ७० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही छोट्या पडद्यावरील पोलिस अधिकारी म्हणून चाहत्यांच्या ते स्मरणात आहेत. हे त्यांच्या यशाचे गमक आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3szYLJi