मुंबई : देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये दिवसागणिक पेशंटची संख्या वाढत चालली असून त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला असून उपचारां अभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. एकूणच देशातील आणि राज्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. या चिंताजनक परिस्थितीवर कलाकार मंडळी खुलेपणाने आपली मते मांडू लागली आहेत. यामध्ये आता अभिनेता आस्ताद काळेचाही समावेश झाला आहे. सध्याच्या एकूण परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारी एक पोस्ट केली आहे. त्यामधून त्याने करोनावरून राज्यात, देशात सुरू असलेला राजकारण आणि सत्ताधारी पक्षावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सिनेसृष्टीमध्ये हा स्पष्टवक्ता अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याला जे वाटते ते तो निर्भिडपणे मांडत असतो. करोनाची सद्यस्थिती, एकूणच आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा आणि अशाही परिस्थितीमध्ये सुरू असलेले राजकारण यावर आस्तादने त्याचे मत मांडले आहे. तो या पोस्टमध्ये लिहितो, ' प्रश्न विचारायचे आहेत...स्वत्व जपायचं आहे....कदाचीत जीव गमवावा लागू शकतो...कारण.. श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही.... अरे हाड..... आम्ही प्रश्न विचारणार.... सत्तेच्या आणि सत्तेल्या प्रत्येकाला.... उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार...... नागडे ...नागडं सरकार...नागडा देश.... निरोप घेतो....' आस्तादने व्यक्त केलेल्या या सडेतोड पोस्टवर युझरनेही विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याआधीही आस्तादने काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या विधानसभा निवडणुका, त्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचारसभा, राजकाराणी लोकांनी काढलेल्या मिरवणुका या सगळ्यावर ही भाष्य केले होते. निवडणुका घेण्याऐवजी देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर द्यायला हवा होता, तर देशातील आज करोनामुळे जी स्थिती उद्भवली आहे ती आली नसती असेही त्याने म्हटले होते. मग ते राज्य सरकार असो वा केंद्र सरकार.. एक वर्षांत तुम्ही काय केले ? असा सवाल त्याने विचारला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eIMU6S