Full Width(True/False)

'डान्स दिवाने ३' मध्ये नोरा फतेहीने केलं माधुरी दीक्षितला रिप्लेस?

मुंबई- कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम '' मध्ये नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये उत्कृष्ट नृत्यांगना असलेली अभिनेत्री अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या जागी परीक्षक म्हणून दिसत आहे. त्यावरून कार्यक्रमाच्या प्रेक्षकांचे अनेक गैरसमज झाले आहेत. प्रेक्षकांच्या मते नोराने माधुरीला रिप्लेस केलं आहे. परंतु, हे सत्य नसून नोरा कार्यक्रमात परीक्षक म्हणून पुढील काही आठवडेच दिसणार आहे. पुढील ४ भागांमध्ये प्रेक्षकांना नोरा परीक्षक म्हणून दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे करोनामुळे कार्यक्रमात हे बदल केले गेले आहेत. महाराष्ट्रात लागलेल्या लॉकडाउनचा फटका चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. त्यामुळे बहुतेक मालिका आणि चित्रपटांचं चित्रीकरण मुंबई बाहेर हलवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे, 'डान्स दिवाने ३' चं चित्रीकरण देखील मुंबईबाहेर बंगळुरू येथे करण्यात येत आहे. माधुरीने नुकताच करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तिच्या तब्येतीची काळजी घेणं आवश्यक असल्याने तिने प्रवास टाळत मुंबईमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी माधुरीच्या जागी नोरा परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहे. कार्यक्रमात नोरासोबत अभिनेता सोनू सूद देखील पाहुणा म्हणून हजेरी लावणार आहे. जेव्हा कार्यक्रमाचं चित्रीकरण मुंबईला शिफ्ट करण्यात येईल तेव्हा माधुरी पुन्हा परीक्षक म्हणून दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी 'डान्स दिवाने ३' च्या सेटवरील तब्बल १८ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राघव जुयाल यालाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया करत आहेत. राघवसोबतच कार्यक्रमाचा परिक्षक धर्मेश येलांडेला देखील करोनाची लागण झाली होती. परंतु, आता धर्मेशने करोनावर मात करत पुन्हा मालिकेत हजेरी लावली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aLb677