मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार नवीन घर विकत करताना दिसत आहेत. काही महिन्यापूर्वी अभिनेत्री करिना कपूर नव्या घरात शिफ्ट झाली. त्यानंतर अभिनेता हृतिक रोशननंसुद्धा नवं घर विकत घेतलं. यात आता बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीचीसुद्धा भर पडली आहे. सनीनं नुकतंच मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतलं आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या घराची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. हिनं मुंबईतील अंधेरी येथे कोट्यवधी रुपयांचं घर विकत घेतलं आहे. अंधेरी पश्चिम येथील अटलांटिस या बिल्डिंगमध्ये १२ व्या मजल्यावर सनीनं हे आलिशान घर घेतलं. ५ बेडरुम असलेल्या या अपार्टमेन्टचा एरिया ४ हजार ९६५ स्क्वेअर फुट एवढा आहे. सनी लिओनीच्या या आलिशान घराची किंमत तब्बल १६ कोटी रुपये एवढी आहे. यासोबतच सनीला या बिल्डिंगमध्ये तीन गाड्यांचं पार्किंगसुद्धा देण्यात आलं आहे. दरम्यान करोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारनं स्टॅम्प ड्यूटीवर मोठी सूट देत ही केवळ ३ टक्के एवढी केली होती. ३१ मार्चला या सवलवतीचा शेवटचा दिवस होता. अशात सनीनं २८ मार्चला हे घर विकत घेत त्याचं रजिस्टर केलं. स्टॅम्प ड्यूटीमध्ये एवढी मोठी सवलत मिळाल्यानंतरही सनीला तब्बल ४८ लाखांची रक्कम स्टॅम्प ड्यूटी म्हणून द्यावी लागली. सनीच्या आधी ऑक्टोबरमध्ये अभिनेता हृतिक रोशननं वर्सोवा येथे ९७.५० कोटी रुपयांचं अलिशान घर विकत घेतलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wGgz8S