Full Width(True/False)

करोना युद्धात ‘सिंघम’ची मुंबई महापालिकेला साथ; 'या' कामासाठी करतोय मदत

मुंबई : भारतामध्ये आलेल्या करोनाच्या दुस-या लाटेची झळ सर्वसामान्यांसोबतच अनेक कलाकारांनाही बसली आहे. करोनाच्या या संकटकाळामध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये सोनू सुद, सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासोबत अजय देवगणही आता पुढे सरसावला आहे. अजय देवगणने करोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी जेव्हा करोनाची पहिली लाट आली होती तेव्हा अजय देवगणने करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या धारावीमध्ये व्हेंटिलेटर दिले होते. आता या करोनाची दुसरी लाट आली असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी आणि बॉलिवूडमधील अन्य काही कलाकार पुढे आले आहेत. या सर्वांच्या मदतीने मुंबई महापालिकेने दादरच्या शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईडच्या हॉलमध्ये एक इमर्जन्सी युनिट स्थापन केले आहे. या हॉलमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० बेड लावले आहेत. तसेच या ठिकाणी वेंटिलेटर, ऑक्सिजन आणि पॅरा मॉनिटर्स लावण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी दाखल होणा-या रुग्णांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहेत. हे सगळे सेटअप उभारण्यासाठी अजय देवगणसोबत दिग्दर्शक आनंद पंडित, बोनी कपूर, लव रंजन, रजनीश खनूजा, लीना यादव आणि आशिम बजाजा, समीर नायर, दीपक धर , ऋषी नेगी, तरुण राठी आणि आरपी यादव यांनी एक कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aMgkQe