Full Width(True/False)

'त्याने मला फसवलं', सोमी अलीचा सलमानसोबतच्या नात्याबद्दल खुलासा

मुंबई- ९० च्या दशकात बॉलिवूड अभिनेत्री अनेक चित्रपटात झळकली होती. परंतु तिचं नाव गाजलं ते अभिनेता सलमान खानसोबत असलेल्या नात्यामुळे. तेव्हा सलमान आणि सोमी यांच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. त्या दोघांच्या नात्याबद्दल प्रेक्षकांमध्येही कुजबुज सुरु होती. काही दिवसांनी दोघांनीही सगळ्यांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोमीने तिच्या आणि सलमानच्या नात्याबद्दल काही खुलासे केले. त्यासोबत तिने चित्रपटसृष्टीतील तिच्या करिअरबद्दल देखील गप्पा मारल्या. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोमीने म्हटलं, 'दिग्दर्शक मला घाबरायचे. मी रिहर्सलसाठी कधीच जायचे नाही. माझी जीवन जगण्याची पद्धत वेगळी होती. मी इथे चित्रपटात अभिनय करण्यासाठी आली नव्हती. मला फक्त सलमानसोबत लग्न करायचं होतं. १९९९ मध्ये जेव्हा आमचं नातं संपलं तेव्हा मी माझ्या घरी मियामीला जाण्याचा निर्णय घेतला. मी जेव्हा मुंबईत होती तेव्हा मी सैफ अली खान आणि चंकी पांडेसारख्या चांगल्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.' सोमी फक्त १६ वर्षांची असताना भारतात आली होती. तिला सलमानसोबत लग्न करायचं होतं. त्यांचं नातं खूप दीर्घकाळ टिकलं परंतु, १९९९ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं आणि सोमी अभ्यासासाठी यूएसला निघून गेली. सलमान सोबतच्या नात्याबद्दल सांगताना तिने म्हटलं, 'माझं आणि सलमानचं नातं तुटून २० वर्ष झाली. त्याने मला फसवलं आणि मी त्याच्यापासून वेगळी झाली. भारतातून निघून गेली. मागची पाच वर्ष मी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही. मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी भारतात आली नव्हती. माझं सलमानसोबत ब्रेकअप झाल्यावर इथे राहण्यात काही अर्थ नव्हता.' सोमीला जेव्हा तिच्या पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये येण्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा तिने नकार देत म्हटलं, 'नाही, मला त्यात काहीच आवड नाहीये. मी या इण्डस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी बनली नाहीये.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31FdzLs