Full Width(True/False)

सारा- जान्हवीचं एकत्र वर्कआउट, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि दोघीही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी आहेत. अर्थात बॉलिवूडमध्ये दोघींनीही आपल्या चित्रपटातून वेगळं स्थान निर्माण केलं आहे. थोड्याफार फरकानं एकामागोमाग एक बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या दोघींचा सोशल मीडियावरही बराच मोठा चाहतावर्ग आहे. दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि सध्या सोशल मीडियावर या दोघींच्या एका व्हिडीओची चर्चा जोरदार सुरू आहे. ज्यात दोघीही एकत्र वर्कआउट करताना दिसत आहेत. सारा अली खान आणि जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये आहेत. अशात एकत्र सुट्ट्या एन्जॉय करण्यासोबत या दोघीही एकत्र वर्कआउट सुद्धा करत आहेत. ज्याची माहिती खुद्द सारानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली. सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती जान्हवीसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सारानं ट्रेनर नम्रता पुरोहितला टॅग करताना लिहिलं, गो विथ फ्लो, स्थीर आणि हळू, किक हाय स्क्वॅट्स लो आणि अशाप्रकारे आम्हाला गोल्डन ग्लो मिळणार आहे. सारा अली खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती जान्हवीसोबत लोअर स्क्वॅट्स करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला जस्टिन बीबरचं गाणं ऐकू येत आहे. जान्हवी आणि साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे आणि दोघांचेही चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत. सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर जान्हवी कपूर लवकरच सिद्धार्थ सेनगुप्ता यांच्या 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3asbaJ8