नवी दिल्लीः Samsung आपली गॅलेक्सी S20 सीरीजचा पॉप्युलर स्मार्टफोन ला डिस्कंटीन्यू करणार आहे. टिप्स्टर Ice Universe च्या माहितीनुसार, या फोनच्या 4G व्हेरियंटला डिसकंटिन्यू करणार आहे. सॅमसंग या फोनच्या ४ जी व्हेरियंटला ५ जी व्हेरियंट मध्ये रिप्लेस करणार आहे. 4G वेरियंट Exynos 990 प्रोसेसर येतो. परंतु, 5G वेरियंट मध्ये कंपनी जास्त पॉवरफुल Snapdragon 865+ प्रोसेसर ऑफर करणार आहे. वाचाः कंपनी गॅलेक्सी S20 FE 5G ला गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आले होते. भारतात फोनच्या 4G व्हेरियंट मध्ये Exynos 990 आणि 5G व्हेरियंट मध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर ऑफर केला जाणार आहे. कंपनीने 4G व्हेरियंटला डिस्कंटीन्यू करून स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसरचा 5G व्हेरियंट ला लाँच करणार आहे. वाचाः फोनचे फीचर्स फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनेच आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. हे 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट सोबत येते. या डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरचा हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. वाचाः प्रोसेसर म्हणून फोनमध्ये 4G व्हेरियंटमध्ये Exynos 990 आणि 5G व्हेरियंट मध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी दिली आहे. फोन २५ वॉटची वायर्ड आणि १५ वॉटची वायरलेसच चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वायफाय ६, ब्लूटूथ ५.० जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखे ऑप्शन दिले आहेत. 4G व्हेरियंटची किंमत भारतात ४९ हजार ९९९ रुपये तर 5G व्हेरियंटची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3moW2kt