Full Width(True/False)

कोणी इतकं....अनुषाबरोबरच्या ब्रेकअपवर करण कुंद्राने दिली प्रतिक्रिया

मुंबई : टिव्ही अभिनेता करण कुंद्राची त्याच्या अभिनयापेक्षा व्यक्तिगत आयुष्यातील घटनांमुळेच अधिक चर्चेत असतो. गेल्यावर्षी करण आणि त्याची गर्लफ्रेंड यांचे झाले. या ब्रेकअपची माहिती अनुषाने सोशल मीडियावर देत, करणने धोका दिल्याचा आरोप तिने केला. अनुषाने हे आरोप केल्यानंतरही करणने अनेक दिवस यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता त्याने याप्रकरणावर मौन सोडले आहे. करणने एका मुलाखतीमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. करण म्हणाला, 'या प्रकरणावर मी इतके दिवस मौन बाळगले होते, कारण या नात्याबद्दल माझ्या मनात आदर होता. हा आदर मला कायम ठेवायचा होता. मी देखील या नात्याबद्दल अनेक उलटसुलट गोष्टी सांगू शकतो परंतु मी असे करणार नाही. कारण माझा स्वभाव तसा नाही. तिने (अनुषाने) जे काही सांगितले तो तिचा दृष्टिकोन आहे. तिने जे काही सांगितले आहे, ते ऐकून मला हसू येते. मला अजूनही खरोखर कळत नाही की एखाद्या व्यक्तीच्या मनात दुस-या व्यक्तीबद्दल इतका तिरस्कार कसा निर्माण होऊ शकतो. आम्ही थोडेथोडके नाही तर साडेतीन वर्षे एकमेकांसोबत घालवले आहेत. खूप छान नाते होते आमचे. या कालावधीमध्ये मी अनेक गोष्टी अनुषाकडून शिकलो आहे. परंतु जेव्हा मी करीअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे तेव्हाच माझ्याविरोधात अशा पद्धतीचे आरोप का केले जात आहेत? एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही खूप छान नात्यामध्ये असता तेव्हा तुम्ही त्याच्यावर असे गंभीर आरोप कसे लावू शकता? ' या मुलाखतीमध्ये करण पुढे म्हणाला, 'माझ्या मते, आम्ही एक वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. एका नात्यामध्ये आपण अनेक गोष्टींवर विचार करत असतो आणि आपल्या प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. आम्ही दोघांनी हे नाते टिकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही. एखाद्या नात्यामध्ये तुम्ही जेव्हा असता तेव्हा तुम्ही येणा-या समस्यांकडे कसे पाहता आणि त्याला कसे सोडवता हे खूप महत्त्वाचे असते. भांडण-तंटा यावर माझा विश्वास नाही आणि लोकांचा विश्वासही मी तोडू शकत नाही. मी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहात आलो आहे आणि यापुढेही तसाच असेल. त्याचप्रमाणे आता माझे सर्व लक्ष माझ्या कामावर ठेवणार आहे. ' दरम्यान करणबरोबरचे नाते संपुष्टात आल्यानंतर अनुषा आता जेसन शहाला डेट करत आहे. हे दोघे डेटवर जात असल्याची माहिती खुद्द जेसने त्या दोघांचा फोटो पोस्ट करून दिली. तर दुसरीकडे करणला यावरून त्याच्या रिलेशन स्टेटसबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'मी अजून तरी सिंगलच आहे. मला नाही वाटत अजून तरी मी या सगळ्यातून बाहेर पडून नव्याने नात्यांबद्दल विचार करू शकेन... परंतु मला एका गोष्टीचे समाधान आहे की या काळात मी माझ्या कुटुंबाच्या खूप जवळ आलो आहे... ते माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचे आहे...'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tvzuRw