मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांची चुलत बहीण सध्या दाक्षिणात्य चित्रपटानंतर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतीच त्याची वेब सीरीज 'द टॅटू मर्डर्स' रिलीज झाली आहे. चित्रपटांसोबतच मीरा नेहमीच तिच्या बिनधास्तपणे आपलं मत मांडण्यासाठी ओळखली जाते. अर्थात यामुळे तिला अनेकदा ट्रोल व्हावं लागतं पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मीरानं खुलासा केला एका निर्मात्यानं तिला बिनधास्तपणे राजकीय विषयावर आपले विचार न मांडण्याचा सल्ला दिला होता. नव्या वेब सीरिज रिलीजनंतर 'स्पॉटबॉय-ई'ला दिलेल्या एका मुलाखतीत मीरा चोप्रा म्हणाली, 'मी सोशल मीडियावर नेहमीच स्वतःचे विचार मांडते. पण त्यामुळे अनेकदा मला ट्रोल सुद्धा केलं जातं. अनेक लोक मला सोशल मीडियावर शिव्या किंवा अपशब्द वापरून कमेंट करतात. पण यामुळे मी माझं मत मांडणं बंद करणार नाही.' मीरा पुढे म्हणाली, 'एक वेळ होती जेव्हा मी राजकीय मुद्द्यावर बरेच ट्वीट करत असे. त्यावेळी मला एका प्रसिद्ध निर्मात्यांनी फोन केला होता. त्यांचं नाव मी घेणार नाही पण ते मला म्हणाले तुला जर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर कृपया असे राजकीय मुद्द्यांवर बोलणं किंवा ट्वीट करणं बंद कर. त्यावर मी त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले, मी यामुळे कोणत्याच समस्येचा सामना करू इच्छित नाही आणि नंतर यामुळे विनाकारण समस्या येत राहतील.' मीरा म्हणाली, 'मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पण त्यानंतरही मी असे ट्वीट करणं चालूच ठेवलं पण नंतर मी असं करणं बंद केलं कारण मला कळून चुकलं होतं की, यामुळे काहीच बदलणार नाही. अशा ट्वीटमुळे फक्त सोशल मीडियावर लोकांना बोलायला एक मुद्दा मिळतो आणि नंतर लोक तुम्हालाच ट्रोल करायला सुरुवात करतात. माझे विचार सोशल मीडियावर मांडल्यामुळे काही बदल घडले असं मी अद्याप पाहिलेलं नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dJvzev